पुणे : मराठा आरक्षण हा मुद्दा महाराष्ट्रासाठी कळीचा बनला आहे. आणि यासाठी सर्वात मोठं शस्त्र ठरलं आहे ते म्हणजे मनोज जरांगे पाटील, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळे लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपला मोठा फटका सहन करावा लागला. तर आता प्रसाद देठे Prasad Dethe Suicide या युवकाने मराठा आरक्षणाच्या मुद्द्यासाठी आत्महत्या केल्याची घटना समोर येते आहे.
https://www.facebook.com/share/v/vDQcYPx2vHkoFfhr/?mibextid=oFDknk
प्रसाद देठे हा युवक मूळचा बार्शी मधील राहणारा असून सध्या ते पुण्यामध्ये नोकरीनिमित्त स्थायिक झाले होते. प्रसाद देठे यांनी सोशल मीडियावर लाईव्ह येऊन आत्महत्येपूर्वी संवाद देखील साधला होता दरम्यान फक्त मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आपण आत्महत्या करत असून माझ्या आत्महत्येला कोणी जबाबदार नाही असं त्यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. त्याचबरोबर पंकजाताई, भुजबळ साहेब, हाके, शेंडगे, ताळेवाडी, टीपी मुंडे, गायकवाड आम्हाला आरक्षण मिळू द्या. अशी विनंती देखील त्यांनी आपल्या सुसाईड मोड मधून केली आहे.
सुसाईड नोटमध्ये नेमकं काय
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालेच पाहिजे. पंकजाताई, भुजबळ साहेब, हाके, शेंडगे, तायवाडे, टी.पी. मुंडे, गायकवाड आम्हाला आरक्षण मिळू द्या. विनंती आहे तुम्हाला. हात थरथरतोय म्हणून अक्षर असं आहे. माझ्या मृत्यूला कोणी जबाबदार नाही. मी स्वखुशीने मरत आहे. जरांगे साहेब आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटू नका. विनंती आहे तुम्हाला. माझं तुम्हाला पटणार नाही, पण मी पूर्ण हताश झालोय. चिऊ मला माफ कर. लेकरांची काळजी घे. धीट रहा. मला माफ करा. तुमचाच प्रसाद
प्रसाद देठे यांनी आत्महत्या केल्यानंतर अनेकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पित केली आहे. परंतु मराठा आरक्षणान पुन्हा एक बळी घेतल्याने वातावरण पुन्हा एकदा चिघळण्याची दाट शक्यता आहे.
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील विधानसभा निवडणूक लढवणार ? 127 जागेवर सर्व्हे देखील केला पूर्ण; वाचा नेमकं काय म्हणाले