कर्नाटक : कर्नाटकातील हासन मतदारसंघातून जेडीएसचे लोकसभा खासदार प्रज्वल रेवन्ना लैंगिक छळ प्रकरणी Sexual harassment case 31 मे रोजी विशेष तपास पथकासमोर SIT हजर राहणार आहेत. खासदार प्रज्वल रेवन्ना Prajwal Revanna यांनी देश सोडून आज महिन्याभरानंतर आज सांगितले की, ” मी एसआयटीच्या चौकशीला सहकार्य करण्यास तयार आहे. 31 मे रोजी त्यांच्यावरील खटल्यांचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकासमोर हजर होईन. “
काय म्हणाले प्रज्वल रेवन्ना
प्रज्वल रेवन्ना यांनी एक व्हिडीओ पोस्ट करून म्हंटले आहे कि, ‘ 26 एप्रिलला निवडणुका झाल्या तेव्हा माझ्यावर कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता आणि एसआयटीही स्थापन करण्यात आली नव्हती. माझा परदेश दौरा पूर्वनियोजित होता. जेव्हा मी परदेशात जात होतो तेव्हा मला या आरोपांबद्दल माहिती मिळाली. राहुल गांधी आणि इतर अनेक काँग्रेस नेते सत्य न कळता माझ्याविरोधात बोलू लागले. माझ्याविरोधात राजकीय षडयंत्र रचले गेले. मी शुक्रवारी, 31 मे रोजी सकाळी 10 वाजता एसआयटीसमोर हजर राहून तपासाशी संबंधित सर्व तपशील देईन. मी चौकशीला पाठिंबा देईन. माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे.
कोण आहे प्रज्वल रेवन्ना
प्रज्वल रेवन्ना हे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे नातू असून हसन लोकसभा मतदारसंघातून एनडीएचे उमेदवार आहेत. प्रज्वलवर महिलांसोबत लैंगिक शोषणाचे अनेक गुन्हे दाखल आहेत.
प्रज्वल हासनमध्ये मतदान झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 27 एप्रिल रोजी जर्मनीला रवाना झाले होते. केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) माध्यमातून एसआयटीने केलेल्या विनंतीनंतर इंटरपोलने ‘ब्लू कॉर्नर नोटीस’ Blue Corner Notice जारी केली आहे. एसआयटीने दाखल केलेल्या अर्जानंतर लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाने १८ मे रोजी प्रज्वल रेवन्ना यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले होते. त्यांचा डिप्लोमॅटिक पासपोर्ट रद्द करावा, अशी मागणी काँग्रेसप्रणीत कर्नाटक सरकारने केंद्राकडे केली आहे.