नागपूर : पुण्यातील ड्रंक अँड ड्राईव्ह Drink and Drive प्रकरण अद्याप देखील धगधगते आहे. दरम्यान या प्रकरणामुळे पुण्यासह महाराष्ट्रामध्ये पोलीस अधिक सतर्क झाले आहेत. असे असताना देखील नागपूरमध्ये Nagpur पुन्हा एकदा ड्रंक अँड ड्राईव्हची मोठी घटना उघडकीस आली आहे.
नागपूरच्या वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या दिघोरी नाक्याजवळ रविवारी रात्री उशिरा भीषण अपघात झाला आहे. वेगात येणाऱ्या ईरटीका कारने फुटपाथवर झोपलेल्या नऊ मजुरांना चिरडले आहे. या अपघातामध्ये दोघा मजुरांचा मृत्यू झाला आहे. दुर्दैवाने या मृतकांमध्ये एका बालकाचा समावेश आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, रविवारी रात्री उशिरा ही ईरटीका कार घेऊन भूषण लांजेवार, सौरभ खंडूकर, वंश झाडे, सन्मय पात्रेकर, अथर्व बानाईत, अथर्व मोघरे आणि ऋषिकेश चौभे हे सात मित्र पार्टीसाठी म्हणून बाहेर पडले होते. यावेळी हे सातही जणमध्ये धुंद अवस्थेत होते. धक्कादायक म्हणजे हे सातही जण 20 ते 22 वयोगटातील आहेत. दरम्यान पार्टी करून झाल्यानंतर या सातही जणांनी नागपूरच्या आऊटर रिंग रोड फिरायला जाण्यासाठी ठरवले आणि गाडी दिघोरी रोड मार्गे जायचे ठरवले. दरम्यान गाडी यावेळी भूषण लांजेवार हा चालवत होता. तर सौरभ कडूकर याच्या मालकीची ही ईरटीका आहे.
दुर्दैवी म्हणजे हा अपघात झाला तेव्हा वाहन चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्यांनी गाडी मागे पुढे केली असल्याचे देखील समजते आहे. त्यामुळे हा अपघात अधिक भीषण ठरला आहे. दोन जण आतापर्यंत मृत्युमुखी पडले असून सात जणांवर उपचार सुरू आहेत. सातही जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळते आहे. परंतु एकंदरीतच पुन्हा एकदा घडलेल्या या घटनेने पोलीस प्रशासनावर आता ताण वाढणार यात शंका नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शहरात ही घटना घडल्याने आता देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेतात याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. याप्रकरणी गृहमंत्र्यांनी कडक कारवाईचे आदेश दिले आहेत.










