श्रीगोंदा : श्रीगोंदा Shrigonda News तालुक्यातील टाकळी कडेवळीत गावात एका विहिरीचे काम करीत असताना अचानक जिलेटीनचा स्फोट Gelatin explosion होऊन 3 कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटात 1 जण गंभीर आहे तर उर्वरित 3 जण जखमी झाले आहेत. याबाबत मलंग बशीर शेख यांच्या फिर्यादीवरून संजय शामराव इथापे याच्याविरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं ?
दिनांक 15 जून रोजी संध्याकाळी 05 च्या सुमारास संजय शामराव इथापे रा.टाकळीकडेवळीत यांनी वामन गेणा रणसिंग यांचे शेतातील विहीरीवर काम करीत असताना मजुरांना लागणारी कोणत्याही प्रकारची सुरक्षा दिली नव्हती. तसेच ब्लास्टींग करणारे प्रशिक्षित डिलर (फायरर) उपलब्ध नव्हते. तसेच स्फोटक पदार्थ वापरण्याचे कोणतेही प्रशिक्षण कामगारांना दिले गेले नव्हते. विहिरीत जिलेटीन स्फोटक पदार्थांचे काम करणे हे अत्यंत धोकादायक असते. त्यामुळे एखादयाचा जीव जावु शकतो हे माहीत असताना देखील मजुरीवर काम करणारे जब्बार सुलेमान इनामदार, सुरज ऊर्फ नासीर युसुफ इनामदार, गणेश नामदेव वाळुंज, नागनाथ भालचंद्र गावडे असे यांना विहीरीमध्ये ब्लास्टींग ट्रॅक्टरच्या मशीनने होल करुन त्यामध्ये ब्लास्टींगचे जिलेटीन कांडया भरण्या करीता प्रवृत्त केले. पोकलँन मशीनच्या सहाय्याने विहिरीत उतरवले, व त्याचे सांगणेवरुन हे मजुर कोणतेही सुरक्षा साधने नसताना विहीरीमध्ये उतरले. होल करुन ब्लास्टींगचे जिलेटीन कांडया होल मध्ये भरण्याचे काम करत असताना विहीरीमध्ये मोठा स्फोट होवुन आत काम करणारे चौघेही स्फ़ोटाच्या दणक्याने विहीरीच्या बाहेर गंभीर जखमी अवस्थेत पडले. त्यामुळे सुरज ऊर्फ नासीर युसुफ इनामदार, वय- 25, गणेश नामदेव वाळुंज, 25 वर्षे सर्व रा. टाकळीकडेवळीत ता.श्रीगोंदा नागनाथ भालचंद्र गावडे, वय- 29 वर्षे रा.बारडगाव ता.कर्जत जि.अहमदनगर यांचे मुत्यृस व वामन गेणा रणसिंग, रविंद्र गणपत खामकर, जब्बार सुलेमान इनामदार, सर्व रा.टाकळीकडेवळीत ता. श्रीगोंदा यांचे गंभीर दुखापतीस संजय शामराव इथापे हा कारणीभुत झाला आहे. घटनास्थळी श्रीगोंदा पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला आहे.
पुण्यात हुल्लडबाजांची संख्या वाढतीये ! Reel बनवण्यासाठी असे धोकादायक स्टंट ? पुणे पोलीस कारवाई केव्हा करणार VIDEO
मलंग बशीर शेख यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात भादवी कलम 304, 285, 286, 337, 338, सह बारी अधिनियम 1908 चे कलम 3, 4, 5, 6 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.