नाशिक : सप्तशृंगी गडावर अन्न औषध प्रशासन विभागाने मोठी कारवाई केली आहे. सप्तशृंगी गडावर मावा आणि पेढ्यामध्ये भेसळ असल्याची माहिती मिळाल्यानंतर अन्न औषध विभागाने कारवाई केली असता मिळालेली माहिती खरी असल्याच निष्पन्न झालं. त्यानंतर तब्बल दोन हजार किलो बनावट मावा जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईनंतर सप्तशृंगी गडावर मोठी खळबळ उडाली आहे. सध्या चैत्र महिना सुरू आहे . त्यामुळे देवीच्या दर्शनासाठी भक्त मोठ्या प्रमाणावर गडावर येत असतात. दरम्यान अन्न औषध प्रशासन दर्जेदार आणि भेसळ रहित अन्नपदार्थ मिळावेत यासाठी मोहीम हाती घेतली आहे.
नेमकं काय घडलं
चैत्रोत्सवानिमित्त देवीच्या दर्शनासाठी भाविक गडावर येत आहेत. भाविकांना शुद्ध प्रसाद मिळावा यासाठी घटना औषध विभागाने मोहीम हाती घेतली असून अन्नपुरवठा निरीक्षक अधिकाऱ्यांनी तब्बल 1944 भेसळयुक्त पेढा आणि मलाई नष्ट केली आहे. या भेसळयुक्त पेढ्याची किंमत पाच लाख 83 हजार 800 रुपये असल्याचे समजते आहे.