मुंबई : रविवारी पहाटे पाचच्या सुमारास प्रसिद्ध अभिनेता सलमान खान Salman Khan याच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर दोन हल्लेखोरांनी हवेत गोळीबार केला. या घटनेने एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी या आरोपींना ताब्यात घेतले. नेमका गोळीबार का केला गेला ? याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय.
कोण आहे हल्लेखोर
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची सूत्र वेगाने फिरवली. आज या प्रकरणातील प्रमुख आरोपी विशालला अटक करण्यात आली आहे. गुजरातमधील भुज मधून या हल्लेखोरांना अटक करण्यात आली. विशाल उर्फ कालू हा लॉरेन्स बिश्नोई गॅंग मधील शूटर असल्याची माहिती मिळते आहे. आरोपी हा मूळ गुडगावचा रहिवासी असून तो राजस्थानमधील गोदारा नावाच्या एका गुंडासाठी काम करतो. धक्कादायक म्हणजे मुसावाला हत्याकांडातील हा एक प्रमुख आरोपी आहे. त्याचबरोबर अनेक इतर हत्या आणि दरोड्याचे देखील त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, अनेक दिवसांपासून हे आरोपी सलमान खानच्या घराची रेकी करत होते. दरम्यान ही घटना घडली तेव्हा अभिनेता सलमान खान आणि त्याचा कुटुंबीय घरीच होतं. अचानक रविवारी पहाटे पाचच्या सुमारास दोघा आरोपींनी हवेत गोळीबार केला. या आरोपींनी गॅलेक्सी अपार्टमेंटच्या दिशेने तीन फायरी झाडल्या आहेत. हा हल्ला सलमान खान याला जखमी करण्याच्या उद्देशाने नाही तर दहशत निर्माण करण्यासाठी होता. अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.