छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर मधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका विवाहित तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तिच्या पतीने सवतीचा फोटो तिला मोबाईलवर पाठवला होता. त्यानंतर ती तणावात होती. अशातच तिने गळफास लावून आत्महत्या केल्याचे तिच्या वडिलांचे म्हणणे आहे.
शेख अहेशा परवीन शेख आलमगीर (वय वर्ष 25) या तरुणीचा विवाह दोन वर्षांपूर्वी झाला होता. अहेशाने फिजिओथेरपीचे शिक्षण घेतले होते. दरम्यान लग्नानंतर तिचे कौटुंबिक वाद विकोपाला गेले, त्यामुळे ती काही महिन्यांपासून माहेरी राहत होती. हे प्रकरण न्याय प्रविष्ट असताना तिच्या पतीने तिला दुसऱ्या पत्नीचे फोटो व्हाट्सअपवर पाठवले. हे फोटो पाहिल्यानंतर ती तणावात राहत होती. आणि त्यानंतरच मंगळवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास तिने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून आत्महत्येचे नेमके कारण समोर येईल असे तपास अधिकारी हेड कॉन्स्टेबल बबन शिंदे यांनी सांगितले आहे.