Crime News : जगभरातून अनेक हत्यांच्या (Crime News) घटना समोर येत आहेत. सध्या मानवी वृत्तीत गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याची प्रकरणं समोर येत असताना एका भारतीय तरुणाने अमेरिकेत जाऊन आपल्या आजी आजोबांसह काकाची हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे फक्त अमेरिकाच नव्हे तर देश हादरलाय. एक २३ वर्षीय तरुण आपल्या आजी आजोबा व काकाची हत्या का करतो यावर अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. या तरुणाला न्यू जर्सी कॉन्डोमिनियममध्ये त्याच्या आजी-आजोबा आणि काकांची हत्या केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. (Crime News grandson murdered uncle along with grandparents)
हा तरुण विद्यार्थी म्हणून शिकत होता. मिडलसेक्स काउंटी अभियोक्ता कार्यालयाने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे की सोमवारी सकाळी 9 च्या सुमारास एका शेजाऱ्याने गोळीबाराचा आवाज ऐकल्यानंतर पोलिसांना माहिती दिली होती. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता घरामध्ये तिघांचे मृतदेह आढळले.
प्रकरण नेमकं काय आहे?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या भारतीय आरोपी विद्यार्थ्याचे नाव ओम ब्रम्हाभट्टवर आहे. गुजरातचा रहिवासी असलेला ओम हा आपल्या आजी आजोबा व काकासोबत अमेरिकेत राहत होता. पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे, घरगुती हिसांचार वाढल्यामुळे त्यानं ऑनलाइन खरेदी केलेल्या पिस्तुलाने हा गुन्हा केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या तरुणाने 72 वर्षीय दिलीपकुमार ब्रह्मभट्ट, 72 वर्षीय बिंदू ब्रह्मभट्ट आणि 38 वर्षीय यशकुमार ब्रह्मभट्ट यांच्यावर गोळ्या झाडल्याचा आरोप आहे. सोमवारी सकाळी 9 वाजता पोलिसांना गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळाली होती. घटनास्थळी पोहोचताच पोलिसांना घरात तीन जणांचे मृतदेह सापडले. त्यात दोन पुरुष आणि एका महिलेचा समावेश होता. तिघांनाही गोळ्या लागल्या होत्या. पोलिसांनी या घटनेनंतर तात्काळ शेजाऱ्यांकडे चौकशी सुरु केली.
हे ही वाचा – Mumbai News : मुंबईचे नागरिक घेणार मुंबईचा निरोप, नेमकं कारण काय असावं?
पोलिसांच्या तपासात काय आलं?
पोलिसांनी सांगितले की, दिलीपकुमार आणि बिंदू ब्रह्मभट्ट यांची त्यांच्या दुसऱ्या मजल्यावरील खोलीमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. तसेच त्यांचा मुलगा यशकुमार ब्रह्मभट्ट यालाही अनेक गोळ्या लागल्या. रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. ओम काही महिन्यांपूर्वीच न्यू जर्सीला आला होता. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ओमने गोळीबार का केला याचं कारण समोर आलेलं नाही. मात्र एका शेजाऱ्याने माध्यमांना सांगितले की घरगुती हिंसाचारामुळे काही दिवसांपूर्वी पोलीस त्यांच्या घरी आले होते. हा सगळा प्रकार अचानक घडलेला नाही यामागे काहीतरी कारण असण्याची शक्यता आहे, असेही पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून संशयित ओमला ताब्यात घेतले. अटकेनंतर त्याला मिडलसेक्स काउंटी अॅडल्ट करेक्शनल फॅसिलिटीमध्ये प्री-ट्रायल डिटेन्शनमध्ये ठेवण्यात आले होते. मंगळवारी न्यायालयात हजर राहिल्यानंतर ओम शांत दिसत होता. पोलिसांचे दिलेल्या माहितीनुसार, ओमनेच सकाळी 911 वर कॉल केला आणि हे कोणी केले असे विचारले असता त्याने हत्येची कबुली दिली होती.