पुणे : शुक्रवार दि. ५ जानेवारी रोजी शरद मोहोळ याच्या हत्येच्या Murder संदर्भाने कोथरूड पोलीस स्टेशन गुन्हा रजि क्रं 2/23 कलम 302,307,34 IPC सह भारतीय हत्यार कायदा कलम 3,25,महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1),(3)सह 135 प्रमाणे दाखल गुन्ह्याच्या तपासात पुणे शहर गुन्हे शाखेची 9 तपास पथके पुणे शहराच्या परिसरात आणि पुणे ग्रामीण, सातारा व कोल्हापूरच्या दिशेने रवाना करण्यात आली होती .
पहा व्हिडीओ : https://www.instagram.com/reel/C1wKEzPro45/?igsh=c3BxdjdyeGFzczUw
त्या दरम्यान पुणे सातारा रोडवर किकवी – शिरवळ दरम्यान तपासात निष्पन्न झालेल्या संशयित स्विफ्ट गाडीचा पाठलाग करून 8 आरोपी, 3 पिस्टल, 3 मॅगझीन, 5 राउंड व 2 चार चाकी गाड्या ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत. शरद मोहोळ बरोबर असलेल्या जमिनीच्या जुन्या वादातुन आरोपीनी केला असल्याचे प्रथम दर्शी तपासात निष्पन्न झाले आहे. सदरची कामगिरी पुणे शहर गुन्हे शाखेने कारवाई करून घटनास्थळी गोळीबार करणाऱ्या व त्यांना मदत करणाऱ्या आरोपीना ताब्यात घेण्यात आलेले आहे.
गुन्हे शाखेनं आठ जणांना अटक केली असून यामध्ये प्रमुख आरोपी साहिल उर्फ मुन्ना पोळेकर, विठ्ठल गडले, अमित मारुती कानगुडे, नामदेव कानगुडे, चंद्रकांत शेळके, विनायक घवाळकर, यासह एडवोकेट रवींद्र पवार आणि एडवोकेट संजय उड्डाण या दोन वकिलांचा देखील समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार रवींद्र पवार आणि संजय उड्डाण या दोन वकिलांनी आरोपींना पळून जाण्यास मदत केली आहे.
घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहे. त्यानुसार, शरद मोहोळ हा घरून लग्नाचा वाढदिवस साजरा करून दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेण्यासाठी आपल्या तीन बॉडीगार्ड सह बाहेर पडला होता. यामध्ये विठ्ठल गांडले, नितीन कानगुडे, आणि साहिल कोळेकर हे तिघेजण होते . सुतारदरा भागातील घरातून बाहेर पडल्यानंतर अवघ्या काही अंतरावरच जवळच्याच लोकांनी घात केला. यावेळी चार गोळ्या झाडण्यात आल्या असून दोन गोळ्या शरद मोहोळ याच्या मानेत ,एक गोळी छातीजवळ आणि एक गोळी डोक्यात लागली असल्याचं समजत आहे. हल्ला केल्यानंतर मारेकरी स्विफ्ट कार आणि एक्सयुव्ही गाडीमधून फरार झाले होते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सह्याद्री रुग्णालयात शरद मोहोळ यास दाखल करण्यात आले होते. परंतु परिस्थिती पाहता ससून रुग्णालयात पुन्हा हलवण्यात आले. परंतु ससून मधील डॉक्टरांनी शरद मोहोळ यास मृत घोषित केले होते . यानंतर प्रमुख आरोपी मुन्ना पोळेकर याला पोलिसांनी पाठलाग करून शिताफीने अटक केली. दरम्यान पुणे पोलिसांनी आतापर्यंत आठ आरोपींच्या मुस्क्या आवळल्या आहेत.