पुणे : पुरंदर तालुक्यातील सासवडमधून एक धक्कादायक बातमी उघडकीस आली आहे. पुरंदर तालुक्यातील सासवड तहसील कार्यालयातून ईव्हीएम मशीन कंट्रोल युनिटची EVM Machine Control Unit चोरी झाल्याचे समजते आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवार आणि रविवार कार्यालयास सुट्टी होती. सोमवारी सकाळी तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांना ईव्हीएम मशीन कंट्रोल युनिट ची चोरी झाल्याचं लक्षात आलं हे ईव्हीएम मशीन स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आले होते यानंतर अधिकाऱ्यांनी पोलीस स्थानकात धाव घेऊन ईव्हीएम मशीनची चोरी झाल्याचं सांगितल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस अधिक तपास करत आहेत.