मुंबई : 1993 साली मुंबई, कानपूर, हैदराबाद, सुरत आणि लखनऊच्या रेल्वेमध्ये स्फोट घडवून आणण्यात आले होते. या प्रकरणी अब्दुल करीम टुंडा हा मुख्य सूत्रधार असल्याच मानलं जात होतं. परंतु आता एक मोठी बातमी समोर येते आहे. राजस्थान मधील अजमेरच्या टाडा कोर्टाने या स्फोटातील मुख्य सूत्रधार अब्दुल करीम टुंडा याची निर्दोष मुक्तता केली आहे.
1993 साली मुंबई, नागपूर, हैदराबाद, सुरत या रेल्वेमध्ये स्फोट घडवून आणण्यात आले होते. आज 31 वर्षानंतर न्यायालयाने निकाल जाहीर केला आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार ज्यास मानलं जात होतं. तो अब्दुल करीम टुंडा यास अजमेर टाडा कोर्टाने निर्दोष मुक्त केलं असून इरफान आणि हमीमुद्दीन या दोघांना दोषी घोषित केले आहे.
अब्दुल करीम टुंडा याला 2013 मध्ये नेपाळच्या सीमेवरून अटक करण्यात आली होती. टाडा कायद्या अंतर्गत या तीन आरोपींच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान 31 वर्ष हे प्रकरण न्यायालयात होतं. या प्रकरणात आजपर्यंत दीडशेहून अधिक साक्षीदारांचे जबाब घेण्यात आले आहेत. केवळ 1993 चे हे बॉम्बस्फोट प्रकरणच नाही तर भारतात अनेक ठिकाणी अब्दुल करीम टुंडा यांच्या विरोधात खटले प्रलंबित आहेत.