पुणे : पुण्यातील सोमवार पेठेत मेफेड्रोन Mephedrone ड्रग्स विक्रीसाठी तस्कर येणार असल्याची माहिती गुप्तबातमीदारांनी पुणे पोलिसांना दिली होती. पुणे पोलिसांनी सापळा रचून या ड्रग्स Drugs तस्करांवर कारवाई केली आणि तिथून सुरू झाले हे धडक कारवाईचे सत्र अद्यापही सुरूच आहे. थोडे थोडके नाही तर आतापर्यंत तब्बल बाराशे कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त करण्यात आले आहे.
पुण्याच्या सोमवार पेठेत केले गेलेल्या कारवाईत वैभव माने, हैदर शेख आणि अजय कारोसिया यातील ड्रग्स तस्करांना अटक करण्यात आली. पुण्याच्या विश्रांतवाडी भागात याहीपेक्षा मोठे घबाड लपल आहे. विश्रांतवाडी भागामध्ये देखील पोलिसांनी धडक कारवाई केली. तिथे मिठाच्या पॅकिंगमध्ये भरून ठेवलेले तब्बल 110 कोटीचे सापडून आले.
जसा हा आकडा कोटींच्या घरात गेला तसं संपूर्ण देशाचे लक्ष आता पुढच्या या ड्रग्सच्या कारस्थानाभोवती आहे. विश्रांतवाडीतील मेसेज तालुक्यातील अर्थकेम या केमिकल कंपनी तयार करण्यात आल्याची माहिती उघडकीस आली. त्यानंतर पोलिसांनी या कंपनीवर छापा टाकून आणखी बाराशे कोटी रुपयांचं मेफेड्रोन जप्त केलं. त्यासह कंपनीचा मालक अनिल साबळे याला देखील अटक करण्यात आली आहे. तर युवराज भुजबळ या वैज्ञानिकाने हे मेफेड्रोन तयार केले होते. अधिक तपास सुरू असताना १४०० कोटी रुपयांचं दिल्लीत पाठवण्यात आलं होतं. तर सांगलीमधून देखील मोठ्या प्रमाणावर जप्त करण्यात आल आहे.
आतापर्यंत पुणे पोलिसांनी 717 किलो, दिल्ली पोलिसांनी 970 किलो मेफेड्रोन जप्त करण्यात आले आहे. तर आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे भारतातच नाही तर थेट लंडनला देखील हे मेफेड्रोन पाठवण्यात आल्याच समाजत आहे. त्यामुळॆ पुढे आता पुणे फक्त ऐतिहासिक ,शैक्षणिक, पारंपारिक वसा जपणारं शहरच नाही तर भारताचा ड्रग्सचा केंद्रबिंदू देखील ठरताना दिसत आहे.