महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत दहावी आणि बारावी परीक्षेसाठी खासगी विद्यार्थ्यांना फॉर्म नंबर 17 भरून परीक्षा देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांचे अतिविलंब शुल्काने अर्ज भरण्यासाठी 7 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
फेब्रुवारी-मार्च 2024 परीक्षेसाठी खासगी विद्यार्थी म्हणून विद्यार्थ्यांचे नावनोंदणी अर्ज ऑनलाइन पद्धतीने विलंब शुल्काने 15 ऑक्टोबरपर्यंत आणि अतिविलंब शुल्काने 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्याच्या तारखा निश्चित केल्या होत्या. परंतु त्यानंतर अतिविलंब शुल्काने अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.
इयत्ता दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे अतिविलंब शुल्कासह अर्ज भरण्यासाठी प्रति विद्यार्थी प्रतिदिनी वीस रुपये देऊन नाव नोंदणी अर्ज सादर करू शकणार आहे. विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज दहावीच्या परीक्षेसाठी http://form17.mh-ssc.ac.in आणि बारावीच्या परीक्षेसाठी http://form17.mh-hsc.ac.in या संकेतस्थळावरून भरायचा आहेत, अशी माहिती राज्य मंडळाने दिली आहे.