कृषी : आपला देश कृषिप्रधान Agriculture देश आहे. खतांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी काय उपाययोजना करायला हव्यात हे आज जाणून घेऊयात.

जेव्हा खत वापरले जाते तेव्हा त्यातील सर्व पोषक तत्त्वे पिकाद्वारे शोषली जात नाहीत. पिकाद्वारे पोषक तत्त्वांचा फक्त एक अंश वापरला जातो.
माती परीक्षण मूल्यांनुसार निर्धारित केलेल्या मातीच्या पोषक पुरवठा शक्तीच्या आधारावर, खतांच्या शिफारसी केल्या जातात.
सेंद्रिय खतांचा नियमित वापर करून जमिनीचा सामू 6.5 ते 7.5 दरम्यान आणावा. विविध जिवाणू खतांचा वापर करावा.
समस्यायुक्त, क्षारयुक्त व चोपण जमिनीत भूसुधारक खतांचा वापर करावा.
जिरायती शेतीमध्ये नत्रयुक्त खते पेरून द्यावीत.
अधिक पाऊस पडणाऱ्या प्रदेशात आणि दीर्घकालीन पिकांसाठी नत्राची एकूण मात्रा 2 ते 3 हप्त्यात विभागून द्यावी.
भात पिकामध्ये युरिया सुपर ग्रॅन्युल्सचा वापर करावा.
नॉयट्रेटयुक्त खते वाहून जाऊ नयेत म्हणून नियंत्रित आणि हलकी पाण्याची पाळी द्यावी.