मुंबई : उल्हासनगरमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणानंतर Ulhasnagar Firing Case गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोखठोक भूमिका घेतली आहे. आज गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे बीड दौऱ्यावर असून यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांना या प्रकरणावर प्रश्न विचारले असता ते म्हणाले की, ” कायद्यासमोर सगळे समान आहेत. कोण कुठल्या पक्षाचा आहे हे विचार न करता कायदेशीरच कारवाई केली जाईल.”
आजच्या उल्हासनगर मधील या गोळीबार प्रकरणानंतर विरोधक देखील चांगलेच आक्रमक झालेले दिसून आले. दरम्यान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची देखील मागणी होत आहे. अशातच आता देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी वरिष्ठ स्तरावर चौकशीचे आदेश डीजींना दिले आहेत. तसेच या संदर्भात अत्यंत कडक कारवाई करण्यात येईल असे देखील फडणवीस यांनी स्पष्ट केल आहे.
महाराष्ट्र हादरला ! उल्हासनगरमध्ये भाजप आमदाराचा शिंदे गटाच्या नेत्यावर पोलीस ठाण्यातच गोळीबार; गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, विरोधक आक्रमक VIDEO