मुंबई : आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणासाठी आझाद मैदानावर देखील परवानगी फेटाळण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत लाखोच्या संख्येने पुढे सरकत असलेले हे भगवे वादळ पुढच्या काही तासातच मुंबईमध्ये येऊन धडकणार आहे. तत्पूर्वी राज्य सरकार जरांगे पाटील मुंबईत येऊ नयेत आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा निघावा यासाठी राज्यसरकार प्रयत्नशील आहे.
आझाद मैदान नाही तर ‘या’ मैदानावर उपोषण करण्याचे मुंबई पोलिसांनी दिले आदेश
आतापर्यंत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दोन वेळा आमरण उपोषण केले आहे. दोन्हीही वेळी सरकारच्या शिष्टमंडळाला यश आले आणि मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले होते. दरम्यान 20 जानेवारी पर्यंत ठोस निर्णय द्यावा असा अल्टिमेटम मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला होता. परंतु तोडगा न निघाल्या कारणाने 20 जानेवारी रोजी मनोज जरांगे पाटील हे भगवं वादळ घेऊन जालन्याच्या अंतरवली सराटी मधून मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. पुढच्या काही तासातच आता हे भगव वादळ मुंबईत येऊन पोहोचणार आहे. तत्पूर्वी ठरल्यानुसार आझाद मैदानावर हे उपोषण जरांगे पाटील करू शकणार नाहीत. तसं मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलं असून मुंबईतील खारघर मधील सेक्टर 29 मधील इंटरनॅशनल कॉर्पोरेशन पार्क मैदान मुंबई पोलिसांनी सुचवले आहे.
काही तासात जरांगे पाटील हे आपल्या सोबतच्या आंदोलकांसह मुंबईत पोहोचत आहेत. एकीकडे आझाद मैदानावर उपोषणाची तयारी सुरू असली तरी मुंबई पोलिसांनी जरांगे पाटील यांना नोटीस पाठवून आझाद मैदान उपोषणासाठी देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे पुढच्या काही तासात आता मुंबईमध्ये काय घटना घडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.