पुणे : पुणे आणि टोळी PUNE CRIME युद्ध हे जणू समीकरणच बनवून राहिले आहे. पुण्यातील हडपसर मधील गोसावी वस्तीमध्ये लाडू वाटण्याच्या किरकोळ वादातून दोन टोकयामध्ये रडा झाला आहे. याप्रकरणी 25 ते 26 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं ?
मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील हडपसर मधील गोसावी वस्तीमध्ये सुरक्षा नगर रोडवर हा प्रकार घडला आहे. राम लकडे हा हडपसर भागात मित्रांसोबत लाडू वाटत होता यावेळी प्रकरणातील दुसऱ्या टोळक्याने त्यांना गाडी आडवी घालून आमच्या परिसरात लाडू वाटल्याच्या रागातून शिवीगाळ करायला सुरुवात केली प्रकरण एवढे विकोपाला गेले की एकमेकांना शिवीगाळ आणि डोक्यात दगड मारून यांनी जखमी केला आहे.
याप्रकरणी राम लकडे याने तक्रार दाखल केली असून रोहन गायकवाड रोहित गायकवाड अमित दुधाने रोहन दोडके राहुल गायकवाड शुभम खिलारे आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघा जणांना अटक देखील करण्यात आली आहे.