सोलापूर SOLAPURE : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी Prime Minister Narendra Modi हे सोलापूर दौऱ्यावर आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते आज सर्वात मोठ्या गृह प्रकल्पाचे उद्घाटन संपन्न झाले आहे. पण या गृहप्रकल्पाच्या उद्घाटन समारंभामध्ये सोलापूरचे आमदार नरसय्या आडम यांनी भाषणा दरम्यान एक मोठी चूक केली आहे. भाषणा दरम्यान त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून अचानक उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांचा उल्लेख केला आणि काही क्षण मंचावर देखील शांतता पसरली.
तर झालं असं की, आजच्या या गृहप्रकल्पाच्या उद्घाटन समारंभासाठी सोलापूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित आहेत. त्यांच्या स्वागतासाठी आणि या गृहप्रकल्पाच्या उद्घाटन समारंभामध्ये सामील होण्यासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार तसेच पालकमंत्री, गृहनिर्माण मंत्री, जिल्ह्यातील खासदार, आमदार आणि बरेच मान्यवर देखील उपस्थित आहेत. या कार्यक्रमांमध्ये भाषणाची सुरुवातच नेमकी आमदार नरसय्या आडम यांनी केली आहे. या भाषणादरम्यान त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचा उल्लेख केला. परंतु काही क्षणातच त्यांना त्यांची चूक लक्षात आली आणि त्यांनी मंचावर बसलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर मान्यवरांसमोरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माफी मागितली.
आमदार नरसय्या अडम यांच्या या चुकी नंतर काही क्षण वातावरण अस्वस्थ झालं होतं. पण त्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी भाषण सुरळीत पणे पार पाडले. यावेळी भाषणामध्ये आडम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले असून सोलापुरात आज दिवाळी आणि रमजान साजरा होतो आहे. कारण पंतप्रधान मोदी यांनी दिलेला शब्द पाळला आहे असं ते म्हणाले आहेत.