‘मैं अटल हूं’ : तीन वेळा देशाचे पंतप्रधान राहिलेले अटलबिहारी वाजपेयी यांच्या राजकीय जीवनावर आधारित हा चित्रपट त्यांच्या जीवनाचे विविध पैलू दाखवणार आहे. राजकारणात पदार्पण करण्यापासून आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधींच्या विरोधात उभे राहण्यापर्यंत अनेक पैलूंना यात स्पर्श करण्यात येणार आहे.
या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. त्यात सविस्तर लिहिलं होतं, ‘कवीपेक्षा जास्त. एका राजकारण्यापेक्षा, पंतप्रधानांपेक्षा जास्त. ‘मैं अटल हूं’चा ट्रेलर चाहत्यांना खूप आवडला होता. अनेकांसाठी आदर्श ठरलेल्या अटल बिहारी वाचपेयी यांचे आयुष्य या चित्रपटात दाखविण्यात येणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी फारसा वेळ शिल्लक राहिलेला नाही. दरम्यान, याबाबत एक अपडेट समोर आले आहे.
चित्रपटाला मिळाले यू/ए प्रमाणपत्र
रवी जाधव दिग्दर्शित ‘मैं अटल हूं’ या चित्रपटाला यूए (यू/ए) प्रमाणपत्र मिळाले आहे. म्हणजेच हा चित्रपट सर्व वयोगटातील व्यक्ती पाहू शकतात. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी ही माहिती दिली आहे. ट्विटनुसार, हा चित्रपट 2 तास 19 मिनिटे, 29 सेकंदाचा आहे. हा चित्रपट १९ जानेवारीला प्रदर्शित होत आहे.
‘मैं अटल हूं’ चित्रपटातील कलाकार
या चित्रपटात पियुष मिश्रा कृष्णबिहारी वाजपेयी (अटलबिहारी वाजपेयी यांचे वडील) यांच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय दया शंकर पांडे हे भाजपचे अग्रगण्य राजकीय पक्ष जनसंघाचे दिवंगत नेते दीनदयाळ उपाध्याय, पायल कपूर नायर देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर अभिनेता हर्षद कुमार भाजप नेते प्रमोद महाजन यांच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये सोनिया गांधी यांची व्यक्तिरेखाही दाखवण्यात आली आहे. पॉला मॅकग्लिन या भूमिकेत दिसणार आहे.