मुंबई : आज राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे Former Chief Minister Sushilkumar Shinde यांचे भाजपकडून BJP मिळालेल्या ऑफरच्या त्या वक्तव्याबद्दल…!
अक्कलकोट तालुक्यातील बोरोटी येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधताना माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे म्हणाले की, ” मला आणि प्रणितीला भाजप पक्षात या असे म्हणते आहे. त्यात आज भाजप नेते आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे सुशील कुमार शिंदे यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे भाजपकडून खरंच सुशील कुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांना ऑफर दिली जाते आहे का ? अशा चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले असताना भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट सांगितले आहे की, ‘ सुशील कुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांना आम्ही कुठलीही ऑफर दिली नाही. आमच्या पक्षाला तशी गरज नाही.’
नेमकं काय म्हणाले सुशीलकुमार शिंदे ?
कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सुशील कुमार शिंदे म्हणाले की, ” माझा दोन वेळा पराभव झाला असला तरीही प्रणिती ताईला आणि मला भाजपकडून आमच्या पक्षात या असं म्हटलं जात आहे. पण काँग्रेस आमच्या रक्तात आहे. आम्ही कधीही काँग्रेस सोडून जाणार नाही. आता मी 83 वर्षाचा आहे. त्यामुळे दुसऱ्याचं बरोबर आहे असं कसं म्हणणार ? तसेच प्रणिती पक्षीय बदलाच्या भानगडीत पडणार नाही. असे देखील ते स्पष्ट म्हणाले आहे.
दरम्यान त्यांच्या या वक्तव्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, ” मी आपल्याला अत्यंत जबाबदारीने सांगतो आहे की भाजपने सुशील कुमार शिंदे किंवा प्रणिती शिंदे यांना ऑफर दिली नाही. भेटी होणे ही वेगळी गोष्ट आहे. मात्र पक्ष म्हणून आम्ही कुठलीही ऑफर दिली नाही. आमच्या पक्षाला तशी गरज नाही. पण कुणीही जर आमचा दुपट्टा घालायला तयार असेल तर आम्ही तयार आहे. आम्ही कुणालाही आमदारकी खासदारकीसाठी पक्षात या असं म्हणणार नाही. परंतु मोदीजींचं नेतृत्व करायला कोणी येत असेल तर आम्ही त्यांचं स्वागत करणार. ” असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.