अयोध्या : येत्या 22 जानेवारीला अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे. यासाठी अयोध्या नगरीच नाही तर संपूर्ण देश उत्साहात तयारी करत आहे. या २२ जानेवारीला भारतात पुन्हा एकदा दिवाळी साजरी केली जाणार आहे. अयोध्येत भव्य राम मंदिरात रामलल्ला प्रतिष्ठापना सोहळा आजपासून सुरु होणार आहे. आज 16 जानेवारीपासून रामलल्लाची म्हणजेच प्रभू श्रीरामाच्या बालस्वरूप मूर्तीची पूजा सुरू होणार आहे. तसेच आजपासून राम मंदिरात विविध कार्यक्रम आणि विधींना सुरुवात झाली आहे.
16 जानेवारी ते 22 जानेवारी दरम्यान होणार हे आहेत विधी
▪️16 जानेवारी : प्रयासचित आणि कर्मकुटी पूजन
▪️17 जानेवारी : मुर्तीचा परीसर प्रवेश
▪️18 जानेवारी : (संध्याकाळी) : तीर्थपूजन, जलयात्रा आणि गांधधिवास
▪️19 जानेवारी : (सकाळी) : औषधाधिवास, केसराधिवास, घृताधिवास
▪️19 जानेवारी : (संध्याकाळी) : धनाधिवास
▪️20 जानेवारी : (सकाळी) : शर्कराधिवास, फलाधिवास
▪️20 जानेवारी : (संध्याकाळी) : पुष्पाधिवास
▪️21 जानेवारी : (सकाळी) : मध्याधिवास
▪️22 जानेवारी : (संध्याकाळी) : शैयाधिवास