मुंबई : आज सकाळीच काँग्रेसला मोठा धक्का देत माजी खासदार मिलिंद देवरा यांनी पक्षातील आपल्या सदस्यत्वाची सोडचिठ्ठी दिली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला हा मोठा धक्का समजला जात असतानाच देवरा यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे. काही वेळापूर्वीच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला असून दहा नगरसेवक देखील त्यांच्या सोबत शिंदे गटामध्ये सामील झाले आहेत.
मिलिंद देवरा कोण आहेत ?
मिलिंद देवरा हे काँग्रेसचे मुंबईतील बडे नेते आहेत. दिवंगत काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मुरली देवरा यांचे पुत्र आहेत. त्यांनी 2004 आणि 2009 ची लोकसभा निवडणूक लढवली आणि जिंकले. डॉ. मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात देवरा हे राज्यमंत्री होते. 2014 आणि 2019 मात्र मिलिंद देवरा यांचा पराभव झाला. ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी मिलिंद देवरा यांना पराभूत केलं.