मुंबई : आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आमदार अपात्रता निकाल सुनावणार MLA Disqualification Verdict Hearing आहेत. काही वेळातच ही सुनावणी सुरू होईल निकालाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन देखील सज्ज आहे.
दरम्यान आमदार पात्रता निकाल सुनावणी पार पडत असून मुंबईत कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यामध्ये विशेष करून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे घर शिवसेना शिंदे गटाचं कार्यालय तसेच आमदारांची कार्यालय या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
दरम्यान मंगळवारी रात्रीच पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आणि मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची तासभर बैठक झाली होती. तर आज पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर दाखल झाल्या असल्या कारणाने चर्चेला उधाण आले आहे.
आजच्या या निकालाच वाचन चार वाजता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे करणार आहेत. 34 याचिकांचे ६ गटात समावेश करून त्यानुसार आता सहा गटात हा निकाल वाचला जाणार आहे. दोनशे पानांचा एक निकाल असून बाराशे पानांचे हे निकाल पत्र आहे. या निकालाच्या नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड उलथापालक तर होणार आहेचं. देशातील राजकीय परिस्थितीवर देखील या निकालाचा परिणाम होऊ शकतो असं राजकीय तज्ञांचं मत आहे.