नाशिक : राज्य सरकारने अपघाताबाबत बनवलेल्या कायद्याविरोधात नाशिक जिल्हा इंधन कंपन्यांच्या वाहतूकदार संघटनेने संप पुकारला होता. सोमवारपासून या संपाला सुरुवात करण्यात आली होती. या संपामुळे राज्यात इंधनाचा तुटवडा, भाजीपाला महागणे, स्कूल बसच्या संपामुळे नागरिकांची आणि मुलांची उडणारी तारांबळ यामुळे वातावरण ढवळले गेले होते. आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलीस अधीक्षक शहाजी आणि इतर प्रमुख अधिकारी यांच्या सोबत टँकर चालकांची बैठक संपन्न झाली आहे. या बैठकीमध्ये समाधानकारक तोडगा निघाला असून जिल्ह्यातील वाहतूकदारांनी संप मागे घेतला आहे.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात ..