राज्यातील नाट्य आणि चित्रपट रसिकांसाठी एक चांगली बातमी आहे. राज्यातील प्रत्येक तालुकास्तरावर नाट्यगृह निर्माण करण्याचा प्रयत्न सरकार करणार असल्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हंटले आहे. आज महाराष्ट्राला मिळालेला समृद्ध सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात राज्यातील 36 जिल्ह्यांत 75 ठिकाणी सिने-नाट्यगृहे उभारण्याचा संकल्प आहे.
तसेच रसिकांची गर्दी आहे, तोपर्यंत नाटकाला ‘अच्छे दिन’ राहणारच. नाट्य संस्कृती रसिकांपर्यंत पोहोचण्यासाठी नाट्यसंमेलनात सांगोपांग चर्चा व्हावी, अशी अपेक्षा सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाची मुहूर्तमेढ नाट्यपंढरी येथील विष्णुदास भावे नाट्यविद्यामंदिरात रोवण्यात आली. या सोहळ्यात ते बोलत होते.