दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आणि डीएमडीके पक्षाचे संस्थापक विजयकांत यांचे गुरुवारी निधन झाले. 71 वर्षीय विजयकांत काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि ते व्हेंटिलेटरवर होते. गुरुवारी विजयकांत यांच्या निधनाने दाक्षिणात्य सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्याच्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम करणारा आणि त्याला आपला गुरू मानणारा अभिनेता विजयलाही आपल्या सहकलाकाराच्या निधनाने धक्का बसला आहे. गुरुवारी सायंकाळी ते विजयकांत यांना अखेरचा निरोप देण्यासाठी गेले होते, मात्र या दरम्यान एक विचित्र घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
खरं तर झालं असं की, विजय थलापथी विजयकांतचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी आपल्या गाडीतून खाली उतरला. यावेळी प्रचंड जमावाने त्यांना घेरले. त्याचे डोळे ओले झाले होते आणि तो आपल्या गुरूला श्रद्धांजली वाहण्यासाठी जात असताना कोणीतरी त्याला चप्पल फेकून मारली. चप्पल अभिनेत्याच्या डोक्यात लागली. हि चप्पल नेमकी कोणी मारली हे व्हिडीओमध्ये तरी दिसत नाहीये.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. चप्पल फेकण्याच्या घटनेवर लोक संताप व्यक्त करत आहेत. लोकांनी याला अतिशय लज्जास्पद म्हटले आहे.
विजय आणि विजयकांत यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. विजयकांत यांनी सेंथुरापंडी या चित्रपटात विजयच्या भावाची भूमिका साकारली होती. विजयकांत यांनी यापूर्वी विजयचे वडील एस. ए. चंद्रशेखर यांच्या 17 चित्रपटांमध्ये काम केले आहे. विजय शेवटचा ‘लिओ’ चित्रपटात दिसला होता.