मुंबई : लोकसभा निवडणुकीची Lok Sabha Elections रणधुमाळी सुरू झाली आहे. जागा वाटपावरून पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर येत आहेत. जास्तीत जास्त जागा मिळाव्यात यासाठी सर्वच घटक पक्ष आपली ताकद लावत आहेत. दरम्यान काल प्रकाश आंबेडकर Prakash Ambedkar यांनी पत्रकार परिषदेमध्ये महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षाने 12 जागा लढवाव्यात असे वक्तव्य केले होते. यावर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे MP Supriya Sule यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली आहे.
आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. त्या म्हणाल्या की, आमची पुढील आठवड्यात बैठक होणार असून जागा वाटपावर सविस्तर चर्चा करू. आठ ते दहा दिवसात समजेल कोणाला किती जागा मिळणार. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षाने बारा जागा लढवाव्यात या वक्तव्यावर आज सुप्रिया सुळे यांनी मोजक्या भाषेत स्पष्ट भूमिका मांडली.
राम मंदिर आमंत्रणावर सुप्रिया सुळे यांची भूमिका
त्याचबरोबर राम मंदिर या विषयावर देखील सुप्रिया सुळे यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्या म्हणाल्या की, राम हा आस्थेचा विषय आहे. जगभरात रामाचे भक्त आहेत. मात्र आम्ही राम कृष्ण हरी वाले आहोत. असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
दडपशाही विरोधात लढत राहू
तसेच यावेळी प्रियंका गांधी यांच्यावर होत असलेल्या कारवाईबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. विरोधी पक्षांवर कारवाई सुरू केली गेली आहे. 90 टक्के केसेस विरोधी पक्षावर होतात. प्रियंका गांधींवरही त्याच पद्धतीने कारवाई करण्यात येत आहे. आमच्या सभांना परवानगी दिली जात नाही. विरोधी पक्षांच्या सभेला परवानगी दिली जात नाही. त्यामुळे आम्हाला सभा घेताना खूप त्रास होतो. या दडपशाही विरोधात आम्ही लढत राहू असा इशाराही यावेळी सुप्रिया सुळे यांनी दिला आहे.