पुणे : पुण्यामध्ये आज तब्बल दहा गॅस सिलेंडर फुटल्याची भीषण घटना घडली आहे. विमाननगर परिसरात एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमध्ये दहा सिलेंडरचे स्फोट झाले आहेत. धक्कादायक म्हणजे या ठिकाणी 100 गॅस सिलेंडर होते. अशी माहिती देखील मिळते आहे. सुदैवानं यापैकी दहा सिलेंडर फुटले आहेत. या फुटलेल्या गॅस सिलेंडरचा खर्च पडलेले फोटो या घटनेची भीषणता सांगत आहेत. दरम्यान अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, सिंबायोसिस कॉलेज, रोहन मिथिला इमारतीलगत असणारया होरिझन डेव्हलपर्स, निऑन साईटस् याठिकाणी कामगारांच्या पञ्याच्या शेड असलेली घरे होती. शेजारील एका पञा बांधकामाच्या ठिकाणी सुमारे १०० च्या आसपास घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडरचा साठा होता. त्याठिकाणी अंदाजे १० ते १२ सिलेंडर फुटल्याने आग लागली होती.
पुणे व पीएमआरडीए अग्निशमन दलाची वाहने वेळेत पोहोचत आग अगदी वेळेत विझवल्याने मोठा धोका टळला असून सुदैवाने कोणी जखमी नाही. अग्निशमन दलाचे वाहन पोहोचले तेव्हा ही दोन सिलेंडरचे स्फोट झाले. परंतू सदर सिलेंडर साठा कोणाचा याबाबत अजून माहिती मिळू शकली नाही. सद्यस्थितीत आग विझली असून कुलिंगचे काम सुरू आहे.