अहमदनगर : एकेकाळी कोरोनान Corona जगभरात थैमान घातलं होतं. मास्क Masks, सॅनिटायझर Sanitizers यातच दोन वर्ष गेली आहेत. 2020 आणि 21 हे वर्ष कोरोनान अनेक बळी घेतले. जे यातून वाचू शकले त्यांना आज देखील त्या कडू आठवणींचा धसका बसला असणार आहे. अशातच पुन्हा एक वाईट बातमी समोर येते आहे. पण अर्थात आता कोरोनाची तेवढी धास्ती घेऊ नका. पण पुन्हा एकदा मास्क आणि सॅनिटायझरचा वापर मात्र आवश्यक आहे.
तुम्ही जर साई दर्शनासाठी जाण्याचा प्लॅन करत असाल, तर ही बातमी संपूर्ण आवश्य वाचा. अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीमध्ये साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी दरवर्षी लाखो भाविक येत असतात. पण आता साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी जाताना तुम्हाला मास्क सक्ती आहे. ही गोष्ट लक्षात ठेवावी लागणार आहे. भारतातील कोरोनाच्या नव्या विषाणूच्या एन्ट्रीमुळे अहमदनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी साई संस्थानला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. यामध्ये साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मास्क सक्ती करण्यात येण्याचे आदेश आहेत. जर भाविकांकडे मास्क नसेल तर त्यांना प्रवेश दिला जाऊ नये अशा कठोर सूचना देखील देण्यात आल्या आहेत.
भारतामध्ये जेएन वन या कोरोनाच्या विषाणूने एन्ट्री केली आहे. पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याकारणाने आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून अहमदनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पहिलं पाऊल उचलल आहे.