कोरोना Corona परत येतोय हे वाक्य ऐकलं तरीही धडकी भरते. 2020-21 आपल्या सर्वांच्या आयुष्यातले सर्वात जड वर्ष होते. अनेक कुटुंबांना आपले जवळचे व्यक्ती गमवावे लागले. त्यामुळे कोरोनाची भीती सर्वात जास्त मनामध्ये बसली आहे. आता पुन्हा एकदा केरळमध्ये कोरोनाचे रुग्ण सापडले असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच महाराष्ट्रमध्ये वाढते प्रदूषण आणि बदलते हवामान यामुळे साथीचे आजार देखील झपाट्याने पसरत आहेत. अशा आजारान पासून संरक्षण व्हावे यासाठी कोरोनाचे प्रमुख नियम WHO ने सांगितले होते. त्यानुसार स्वतःची स्वच्छता, सरीटायझरचा वापर, मास्कचा वापर, घर आणि परिसराची स्वच्छता हे उपाय तर कायम ठेवावेतच त्यासह एक काढा आहे ज्या काढ्याचे रोज अगदी अर्धा कप तरी सेवन करावे आणि थंडीच्या दिवसात हमखास सेवन करा.
काढा बनवण्यासाठी आवश्यक सामग्री
दोन कप पाणी,
दोन लवंग,
दोन मिरे,
हळद – अर्धा छोटा चमचा
गूळ – अर्धा छोटा चमचा
मध – एक छोटा चमचा
जिरे – अर्धा छोटा चमचा
तुळशीची पाने – तीन-चार
ताजे आले किंवा सुंठ पावडर – अर्धा छोटा चमचा
दोन कप पाणी गॅसवर उकळायला ठेवा. यामध्ये हे सर्व जिन्नस घालून दोन कप पाणी एक कप होईपर्यंत वाटावा जेणेकरून या सर्व पदार्थांचा अर्क त्यात उतरेल. आता हा काढा गाळा. एक कप काढा पैकी अर्धा अर्धा कप जरी गरम काढा घशाला शेकत रोज एकदा घेतला तरी साथीचे रोग आणि अगदी कोरोना देखील तुमच्या जवळ येऊ शकणार नाही.
महत्वाची टीप : तब्येत जर जास्त खराब असेल तर वैद्यकीय सल्लाच आवश्यक आहे. हा वैद्यकीय सल्ला नाही.