हैद्राबाद : तेलंगणाचे Telangana माजी मुख्यमंत्री आणि बीआरएसप्रमुख के चंद्रशेखर राव Former Chief Minister K Chandrasekhar Rao जखमी Injured झाले आहेत. काल रात्री ते त्यांच्या एरावल्ली येथील फार्महाऊसवर पाय घसरून पडल्याने जखमी झाले आहेत. त्यांच्या कमरेला मार लागल्याचे समजते आहे. त्यांना यशोदा रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे. त्यांची प्रकृती चांगली आहे.
माजी मुख्यमंत्री केसीआर यांची मुलगी के. कविता यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली, “बीआरएसचे सर्वेसर्वा केसीआर गारू यांना किरकोळ दुखापत झाली आहे, ते सध्या रुग्णालयातील तज्ञांच्या देखरेखीखाली आहेत. तुम्हा लोकांच्या पाठिंब्यामुळे आणि शुभेच्छांमुळे बाबा लवकरच बरे होतील. सर्वांच्या प्रेमाबद्दल आभारी आहे. “
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही माजी मुख्यमंत्री केसीआर यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले कि, तेलंगणचे माजी मुख्यमंत्री केसीआर यांना दुखापत झाल्याचे ऐकून दु:ख झाले. मी त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करतो. “