सिंधुदुर्ग : भारतीय नौदल दिन Indian Navy Day आज साजरा केला जातो आहे. नौदल दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी Prime Minister Narendra Modi हे आज सिंधुदुर्ग Sindhudurg येथे उपस्थित आहेत. भारतीय नौदल दिनाच्या निमित्ताने आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. सिंधुदुर्गाच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे अनावरण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न झाल आहे. यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी १६६० मध्ये या राजकोट किल्ल्याचं बांधकाम करवले होते. याच किल्ल्यावर नौदल दिनाचे निमित्त साधून छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य पुतळा उभारण्यात आला आहे. या भव्य दिव्य पुतळ्याचे अनावरण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले.
https://www.facebook.com/emahatalks/videos/360059583100747
या कार्यक्रमा वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटेल अशा घोषणा केल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदलाच्या अधिकाऱ्यांच्या वर्दीवर छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा यापुढे असेल तसेच भारतीय नौसेना रँक्सचं नामकरण देखील भारतीय परंपरेनुसार करणार या दोन महत्त्वाच्या घोषणा आज नरेंद्र मोदी यांनी केल्या आहेत.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणले कि, “आज ४ डिसेंबर हा ऐतिहासिक दिवस आपल्याला आशीर्वाद देतो की, सिंधुदुर्गचा ऐतिहासिक किल्ला. मालवण तारकल्लीचा हा सुंदर किराणा, चारही बाजूने छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रताप पसरलेला आहे. त्यांच्या विशाल प्रतिमेचं अनावरण आणि तुमच्यासाठी हुंकार प्रत्येक भारतीयाला जोशाने भरत आहे. तुमच्यासाठीच म्हटलं गेलं आहे की, चलो नयी मिसाल हो, बडो नया कमाल हो, झुको नहीं, रुको नही, बढे चलो. मी नौदलाच्या परिवाराच्या सर्व सदस्यांना नौदल दिनाच्या शुभेच्छा दितो. मी आजच्या दिवशी त्या शूरवीरांना प्रणाम करतो ज्यांनी मातृभूमीसाठी आपलं सर्वोच्च बलिदान दिलंय”, सिंधुदुर्गाच्या भूमीवरुन आज नौदल दिनाच्या शुभेच्छा देणं ही खूप मोठी घटना आहे. सिंधुदुर्गाच्या ऐतिहासिक किल्ल्याला पाहून प्रत्येक भारतीयाची छाती गर्वाने भरते. कोणत्याही देशासाठी समुद्र सामुग्री किती महत्त्वाची आहे याची जाणीव छत्रपती शिवाजी महाराजांना होती. जो समुद्रावर नियंत्रण ठेवतो तो सर्वात शक्तीमान आहे. त्यांनी एक शक्तिशाली नौसेना बनवली. कान्होजी आंग्रे असतील, मायाजी नाईक भाटकर असतील, असे अनेक योद्धा आजही आमच्यासाठी खूप मोठी प्रेरणा आहेत. मी आज नौसेना दिवसानिमित्ताने देशाच्या या वीरांना प्रणाम करतो”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.