Health Is Wealth : शरीरामध्ये होणाऱ्या वेदना थांबवण्यासाठी आपण अगदी सहजपणे पेन किलरचा Pain Killer वापर करत असतो. या औषधांमुळे Medicine काही मिनिटांमध्ये तुम्हाला अराम मिळतो. बऱ्याच पेन किलर मुळे झोपही येते. हि संपूर्ण प्रक्रिया किंवा हे औषध तुमच्या शरीराच्या त्या ठराविक भागात होणारी वेदना संपवण्यासाठी आणि शरीराला अराम देण्यातही काम करते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, पेन किलरमध्ये नेमकं काय असते, ज्यामुळे तुमच्या वेदना थांबतात ?

मानवी मेंदू हा सर्वात जटिल आहे. दिवसभरातील लहानापासून मोठ्या हालचाली, संवाद आणि प्रत्येक गोष्ट हे आपला मेंदूच नियंत्रित करत असतो. जेव्हा आपल्याला दुखापत होते, तेव्हा आपल्या शरीरातील कोणत्याही भागात लहान मोठी इजा होते तेव्हा सिग्नल थेट मेंदूला जातो, जो आपल्याला संदेश देतो की आपल्याला वेदना होत आहे, तेव्हा ज्यामुळे आपल्याला वेदना जाणवते.
हे वाचलेत का ? Deputy CM Ajit Pawar ! राज्यातील ‘या’ शहरांमध्ये विकसित होणार अत्याधुनिक बस स्थानक, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
नेमके पेन किलर हे दुखणे कसे संपवतात ?

पॅरासिटामॉल किंवा ब्रुफेन सारखी औषधे ही वेदना एका खास प्रकारे कमी करतात. जेव्हा आपल्याला दुखापत होते तेव्हा आपल्या शरीरात अशी अनेक रसायने तयार होत असतात. ज्यामुळे आपल्याला वेदना होतात. अशा परिस्थितीत, शरीर जखमी ठिकाणी अधिक रक्त पोहोचवू लागते.
▪️ रक्तामध्ये पांढऱ्या रक्त पेशी देखील असतात ज्याचा उपयोग जखम बरी करण्यासाठी केला जातो. या पांढऱ्या रक्तपेशींसोबतच अनेक प्रमुख रसायनेही दुखापतीच्या ठिकाणी पोहोचतात. या प्रमुख रसायनांपैकी एकाचे नाव प्रोस्टॅग्लॅंडिंग आहे. यामुळे वेदना आणि जळजळ होते.
▪️ जेव्हा तुम्ही ही औषधे खाता तेव्हा ती हळूहळू तुमच्या रक्तात मिसळतात आणि दुखापतीच्या ठिकाणी तसेच मेंदूला जातात.
▪️ दोन्ही ठिकाणी, ते वेदना कमी करण्यासाठी हे रसायन तयार होण्यापासून रोखतात, जेणेकरून मेंदू आपल्याला वेदना होत असल्याचे संकेत देत नाही.
.▪️ यामुळे या पेन किलर खाल्ल्यानंतर काही वेळातच आपल्या वेदना थांबतात आणि आपल्याला आराम मिळतो.
पेन किलर घेणे किती योग्य ? How appropriate is it to take a pain killer?

एक माहिती नेहमी असुद्या, मानवी शरीर हे एका पातळीपर्यंत अगदी विष देखील पचवू शकते. पण म्हणून विषाची परीक्षा कधीही घेऊ नये. अल्कोहोल, सिगारेट, तंबाकू, वेगवेगळे ड्रग्स हे देखील तोपर्यंत शरीराला पूर्णतः घातक ठरत नाहीत जोपर्यंत त्यांचे अति सेवन केले जात नाही. अर्थात व्यसन लागत नाही तो पर्यंत तुमचे शरीर तेही पचवतेच. अन्यथा त्याचे घटक परिणाम खुद्द जा पदार्थ किंवा पेयांच्या जाहिरातींमध्ये देखील सांगितले जातात. एव्हढच काय तर अगदी आपण रोज पितोच अशा चहा आणि कॉफी यांमध्ये देखील शरीराला अपायकारक घटक असतातच. त्याच प्रमाणे हि पेन किलर घ्यावीत जेव्हा डॉक्टर स्वतः ते घेण्यास सांगतील. आणि तेव्हाच घ्यावीत जेव्हा खरंच वेदना या असह्य होतील. पेन किलर मुळे शरीराच्या वेदना थांबतात, शरीर हलके वाटते आणि शांत झोप लागते. यामुळे अनेकांना थोडे जरी दुखले तरी गोळ्या घेण्याची सवय लागू शकते. पण पेन किलरचा अति वापर देखील तुमच्या शरीराला खूप अपायकारक ठरू शकते.