Indian Cricket Team Head Coach : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच BCCI नं राहुल द्रविडला पुन्हा एकदा टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक बनवले आहे. वनडे वर्ल्डकप २०२३ नंतर द्रविडचा करार संपला होता. आता बीसीसीआयने राहुल द्रविडचा (Rahul Dravid) करार वाढवला आहे. टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याच्यासह सपोर्ट स्टाफचादेखील करार वाढवण्यात आला आहे. द्रविड मुख्य प्रशिक्षकच राहणार आहे. विक्रम राठोड हे फलंदाजी प्रशिक्षक, पारस म्हांबरे गोलंदाजी प्रशिक्षक आणि टी दिलीप क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून कायम राहतील. (rahul dravid become head coach of india cricket team once again bcci)

द्रविडचा करार नव्याने सुरू
BCCI च्या प्रेस रिलीझमध्ये म्हटले आहे की, “नुकत्याच संपलेल्या एकदिवसीय विश्वचषकानंतर बीसीसीआयने राहुल द्रविड यांच्याशी अर्थपूर्ण चर्चा केली आणि सर्वांच्या संमतीने त्यांच्या कोचपदाचा करार वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.” याआधी राहुल द्रविडचा हेड कोच पदाचा करार २ वर्षांसाठी होता. २०२३ च्या वनडे विश्वचषकानंतर हा करार संपला. आता हा करार नव्याने सुरू झाला आहे.
हे ही वाचा – Gautam Singhania : सध्या चर्चेत असणारे गौतम सिंघानिया कोण? जाणून घ्या
राहुल द्रविडच्या हेड कोचपदाच्या कार्यकाळात भारताने टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल, २०२२ च्या टी-20 वर्ल्डकपची सेमी फायनल आणि २०२३ च्या वनडे वर्ल्डकपची फायनल खेळली. या सर्व सामन्यात भारताचा पराभव झाला. या सर्व पराभवानंतर राहुल द्रविड पत्रकारांच्या आणि टीकाकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना दिसला. त्याने आपल्या फलंदाजीसारखेच अगदी संयमाने सर्व प्रश्नांची उत्तरे दिली.

एकाच वेळी तीनही फॉरमॅटमध्ये नंबर वन
राहुल द्रविडच्या प्रशिक्षणातच भारतीय संघ एकाच वेळी तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर वन बनला. आतापर्यंत भारताशिवाय फक्त दक्षिण आफ्रिकेचा संघच हे करू शकला आहे. द्रविडने तिन्ही फॉरमॅटला एकत्र महत्त्व दिले. त्याच्या प्रशिक्षणाखाली भारताने एकदिवसीय सामन्यांमध्ये दोनदा ३००+ धावांनी विजय मिळवला.