chennai pune bharat gaurav train : भारत गौरव एक्सप्रेस (Bharat Gaurav express) मधील प्रवाशांची प्रकृती अचानक बिघडली. ही एक्सप्रेस चेन्नईहून पुण्याला येत होती. प्रवाशांना विषबाधा झाल्याचे सांगितलं जात आहे. हे समजताच तातडीनं पुणे रेल्वे स्थानकावर उपचार देण्यात आले. या सर्व प्रवाशांना ससून रुग्णालयात उपचारासाठी व्यवस्था करण्याचे आदेश देखल देण्यात आले आहे. तब्बल ४० प्रवाशांना हा त्रास झाला असल्याची माहिती आहे. ससून रुग्णालयाच्या डॉक्टरने प्राथमिक उपचार केल्यानंतर सगळ्या ४० प्रवाशांची प्रकृती स्थिर असल्याचा माहिती मिळत आहे. (Bharat Gaurav express passengers poisoned chennai pune bharat gaurav train)

चेन्नईहून पुण्याकडे येत असलेल्या भारत गौरव यात्रेत अनेक प्रवाशांची प्रकृती खराब झाली. नागरिकांना उलटया आणि मळमळ या सारखा त्रास होऊ लागला. दरम्यान, गाडी पुणे स्थानकावर येण्या याधी या संदर्भात रेल्वे प्रशासनाला माहिती देण्यात आली होती. आणिबाणीची परिस्थिति असल्याने ससून रुग्णालयाच्या पथकाला पुणे रेल्वे स्थानकावर तैनात करण्यात आले होते. ही गाडी मध्यरात्री पुणे रेल्वे स्थानकावर येताच ससून रुग्णालयातील स्टाफ आणि डॉक्टरांनी तातडीने ४० प्रवाशांना प्राथमिक उपचार दिले. प्लॅटफॉर्मवरच विषबाधा झालेल्यांवर प्राथमिक उपचार करण्यास सुरुवात करण्यात आली.
काही नागरिकांना ऑक्सीजन देखील लावण्यात आले. त्यानंतर त्यांना ससून रुग्णालयात पाठवण्यात येणार होते. या साठी ससून रुग्णालय प्रशासनाला ४० बेड तयार ठेवण्याचे आदेश देखील देण्यात आले होते. दरम्यान, प्राथमिक उपचार दिल्यावर प्रवाशांची प्रकृती स्थिर झाल्याने त्यांना ससुन रुग्णालयात भरती करण्यात आले नाही. दरम्यान, अन्नातून ही विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त केला आहे जात आहे. या बाबत तपास करण्याच्या सूचना रेल्वे प्रशासनाने दिला आहे.
रेल्वेतील जेवण्याच्या दर्जा बाबत नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात. लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील खानपान सुविधा, पेन्ट्री कार काढून टाकल्याने लोकांना ताजे अन्न मिळत नाही. त्यामुळे प्रवाशांना अधे मध्ये येणाऱ्या स्थानकावरील जेवण घ्यावे लागते. या जेवणाचा दर्जा सुमार असतो. यामुले यासरख्या घटना पुढेही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रेल्वेने पुन्हा पेन्ट्रीकार सुरु कराव्यात, अशी मागणी रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी रेल्वे प्रशासनाला केली आहे.