Nana Patekar : नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी आपल्या दमदार अभिनयाने सगळीकडेच ठसा उमटवला आहे. ‘वेलकम’, ‘तिरंगा’, ‘नटसम्राट’, ‘यशवंत’, ‘काला’, ‘परिंदा’, ‘अग्नीसाक्षी’ यांसारख्या अनेक सिनेमांच्या माध्यमातून अभिनेते नाना पाटेकर यांनी चाहत्यांच्या मनावर आणि सिनेविश्वावर राज्य केलं. आज देखील नाना पाटेकर यांना मोठ्या पडद्यावर पाहाण्यासाठी चाहते उत्सुक असतात. वयाच्या 72 व्या वर्षी देखील नाना पाटेकर तितक्याच उत्साहाने आणि आनंदाने अभिनय करतात. नाना पाटेकर यांना प्रोफेशनल आयुष्यात प्रचंड यश मिळालं. आजही नाना पाटेकर यांचं इंडस्ट्रीमध्ये असलेलं स्थान कोणी घेऊ शकलं नाही. पण खासगी आयुष्यात मात्र नाना पाटेकर यांनी अनेक चढ – उतारांचा सामना करावा लागला. सध्या सर्वत्र नाना पाटेकर यांच्या वैवाहिक आयुष्याची चर्चा रंगलेली आहे. (Nana Patekar lives separately from his wife neelakanti patekar without divorce Manisha Koirala actress)
नाना पाटेकर यांनी वयाच्या 27 व्या वर्षी निलकांती यांच्यासोबत लग्न केलं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर त्यांनी विभक्त राहाण्याचा निर्णय घेतला. नाना पाटेकर आणि निलकांती घटस्फोट न घेता विभक्त राहात आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून निलकांती आणि नाना पाटेकर विभक्त राहात आहेत. पण त्यांच्या नात्याच्या चर्चा कायम रंगलेल्या असतात.
रिपोर्टनुसार, नाना पाटेकर यांच्या प्रेमप्रकरणांबद्दल कळल्यानंतर निलकांती यांनी त्यांच्यापासून विभक्त राहाण्याचा निर्णय घेतला. एककाळ असा होता, जेव्हा फक्त बॉलिवूडमध्ये नाही तर, चाहत्यांमध्ये देखील अभिनेत्री मनिषा कोईराला (Manisha Koirala) आणि नाना पाटेकर यांच्या नात्याच्या चर्चा रंगल्या होत्या. नाना पाटेकर यांच्या अफेअरबद्दल कळल्यानंतर निलकांती घर सोडून गेल्या… असं अनेकदा समोर आलं.
दरम्यान, रंगणाऱ्या चर्चा फक्त आणि फक्त अफवा आहेत.. असं खुद्द नाना पाटेकर म्हणाले होते. निलकांती यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, त्या देखील रंगभूमी कलाकार होत्या. नाना पाटेकर आणि निलकांती यांची पहिली ओळख रंगमंचावरच झाली होती. निलकांती उत्तम अभिनेत्रीसोबतच लेखका देखील होत्या.
निलकांती तेव्हा अभिनयासोबतच एका बॅंकेत नोकरी देखील करत होत्या. तेव्हा निलकांती यांचं वेतन 2 हजाप 500 रुपये होतं… एका मुलाखतीत खुद्द नाना पाटेकर यांनी ही गोष्ट सांगितली होती. नाना पाटेकर आणि निलकांती यांना एक मुलगा आहे. त्याच्या मुलाचं नाव मल्हार पाटेकर असं असून त्याचं स्वतःचं प्रॉडक्शन हाऊस आहे. मल्हाप पाटेकर लाईमलाईटपासून दूर असतो.
आणखी वाचा – Pooja sawant post: “We are engaged…” अखेर पूजा सावंतनं उरकला साखरपुडा, कोण आहे ‘ही’ व्यक्ती?
काही दिवसांपूर्वी त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. चित्रपटाच्या शुटिंग दगम्यान एक चाहता सेल्फी काढायला आला असता त्यांनी त्याचा कानाखाली लगावली होती. अशातच तो व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.