गुगल GOOGLE SEARCH जगात सर्वाधिक वापरले जाणारे सर्च इंजिन आहे. गुगलवर प्रत्येक गोष्टीची माहिती मिळते. पण गुगल जितके फायद्याचे आहे, तितक्याचे तोट्याचे आहे. गुगलवर काही गोष्टी सर्च करणे गुन्हा आहे. भारतात गुगलवर काही गोष्टी सर्च करण्यास बंधने आहेत. गुगलवर तुम्ही त्या गोष्टी सर्च केल्या तर तुम्हाला तुरुंगात जावे लागेल. कोणते आहेत ते प्रश्न वाचा सविस्तर …
- बॉम्ब तयार करण्याची पद्धत Method of making bombs
भारतामध्ये बॉम्ब तयार करणे, हा गंभीर गुन्हा मानला जातो. जर तुम्ही गुगलवर बॉम्ब तयार करण्याची पद्धत सर्च करत असाल, तर तुम्हाला दहशतवादाच्या आरोपात अटक केली जाऊ शकते.
- चाइल्ड पोर्नोग्राफी Child pornography
भारतामध्ये चाइल्ड पोर्नोग्राफी हा गंभीर प्रकारचा गुन्हा आहे. जर तुम्ही गुगलवर अशा गोष्टी सर्च करत असाल तर तुम्हाला बाल यौन शोषणाच्या आरोपात अटक केली जाऊ शकते.
- अवैध औषध Illegal drug
भारतामध्ये अवैध औषधांची विक्री आणि खरेदी करणे गंभीर गुन्हा मानला जातो. जर तुम्ही गुगलवर अवैध औषधं सर्च करत असाल तर ड्रग्सच्या गुन्ह्यात तुम्हाला अटक होऊ शकते. त्यानंतर तुम्हाला तुरुंगाची हवा खावी लागेल.
- हॅकिंग Hacking
भारतात हॅकिंग हा एक गंभीर गुन्हा मानला जातो. जर गुगलवर तुम्ही हॅकिंगसंदर्भात सर्च करत असाल, तर सायबर गुन्ह्याखाली तुरुंगवास होऊ शकतो. त्यामुळे गुगलवर चुकूनही हॅकिंग संदर्भात सर्च करु नका, किंवा काळजी घ्या. वरील चार गोष्टींशिवाय गुगलवर काही इतर संवेदनशील गोष्टी सर्च करणेही गंभीर गुन्हा आहे.