राज्यामध्ये सहाय्यक प्राध्यापक पदासाठी Assistant Professor सेट Set Exam ही परिक्षा घेतली जाते. मात्र ही परिक्षा वर्षातून एकदाच होत असल्याने भावी प्राध्यापकांना वाट पाहावी लागत होती. मात्र आता ज्याप्रमाणे देश पातळीवरील सहाय्यक प्राध्यापक पदासाठीची नेट ही परिक्षा वर्षातून दोनदा होते. त्याप्रमाणे सेट ही परिक्षा देखील वर्षातून दोनदा होणार आहे.
हे वाचलेत का ? MHADA Lottery : गृहनिर्माण मंत्री अतुल सावेंची मोठी घोषणा; म्हाडाच्या 11 हजार घरांच्या किमती कमी होणार ! वाचा सविस्तर वृत्त
▪️ याबद्दल विद्यापीठ अनुदान आयोग पुरस्कृत सुकाणू समितीने गठित केलेल्या समितीच्या निर्णयांच्या आधारे हे नवे बदल होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर राज्यात सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे यांच्याकडून घेतली जाणारी सेट ही परिक्षा आतापर्यंत ऑफलाईन घेतली जात होती. मात्र आता ती ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे.
▪️ मात्र यंदा होणारी सेट परिक्षा ऑफलाईनच असणार आहे. ही सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे यांच्याकडून घेतली जाणारी शेवटची ऑफलाईन सेट परिक्षा असणार आहे. त्याचे वेळापत्रक पुढील आठवड्यात जाहीर करण्यात येणार आहे. दरम्यान राज्यात होणाऱ्या इतर ऑनलाईन परिक्षांचा गोंधळ पाहता अद्याप देखील सेट परिक्षा ऑनलाईन घ्यायची की, नाही याचा विचार सुरू आहे.

दरम्यान, ही परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याचा आमचा विचार असल्याचं सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉक्टर पराग काळकर यांनी सांगितलं.