पुणे : पावसाळी ट्रीप प्लॅन करता आहात? तर कमी थकवणारे आणि एका दिवसात पटकन जाऊन फिरता येतील असे स्पॉट्स तुम्ही शोधत असालच. तर आम्ही तुमच्यासाठी पुण्याजवळील पाच ठिकाणं सांगणार आहोत. तिथे जाऊन तुम्ही मनमोकळेपणाने ट्रेकींगचा आनंद घेऊ शकतात. मानसशास्त्रज्ञांच्या मते, खडबडीत डोंगर आणि दरी मार्गावरून पायी प्रवास केल्याने तुम्ही लढाऊ आणि निर्भयी बनता. यासोबतच तुमचा आत्मविश्वासही वाढतो. त्यामुळे तुम्ही ट्रेकींगचा अनुभव नक्कीच घेवू शकता.
राजगड
रायगडच्या आधी राजगड ही मराठा साम्राज्याची पहिली राजधानी होती. हे ठिकाण ट्रेकिंगसाठी चांगला पर्याय मानले जाते. त्यामुळे येथे ट्रेकर्सची मोठी गर्दी असते. पावसाळ्यात तुम्ही इथे ट्रेकिंग करू शकता.
राजमाची
राजमाची हा किल्ला लोणावळ्याजवळ आहे. राजमाची जवळच स्मिता शिरोटा धरण देखील आहे. त्याची चढण अगदी सोपी आहे. जमिनीवरून गडाच्या माथ्यावर जाण्यासाठी फक्त 40 मिनिटे लागतात. किल्ल्यावर दोन गुहा आहेत, ज्यामध्ये सुमारे 40 लोक एकत्र जाऊ शकतात. या किल्ला पुण्यापासून 82 किमी अंतरावर आहे.
विसापूर
विसापूर लोहगड जवळ आहे. हे ठिकाण ट्रेकिंगसाठीही खूप फेमस आणि चागले मानले जाते. इथली चढण अवघड आहे. पावसाळ्यात विसापूर हे ठिकाण अतिशय सुंदर दिसते. या डोंगराच्या माथ्यावर अनेक धबधबे आहेत. विसापूर पुण्यापासून 78 किमी अंतरावर आहे.
सिंहगड
सिंहगड हे पुण्याजवळील लोकप्रिय पिकनिक स्थळांपैकी एक आहे. या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता चांगला आहे पण गडावर जाताना ट्रेकिंगला प्राधान्य देणारे लोक मोठ्या संख्येने आहेत. सिंहगड पुण्यापासून 35 किमी अंतरवर
पुरंदर
पुरंदर किल्ला हा महाराष्ट्रातील प्रमुख ऐतिहासिक किल्ल्यांपैकी एक आहे. हा किल्ला पुरंधर किल्ला म्हणूनही ओळखला जातो. पुरंदर किल्ला हा महाराष्ट्राच्या पुण्यातील पश्चिम घाटावर आहे. पुरंदर किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदिल शाही विजापूर सल्तनत आणि मुघल विरुद्धच्या उदयाचे प्रतीक म्हणून ओळखला जातो कारण हा शिवाजी महाराजांचा पहिला विजय होता. इथेही पावसाळ्यात लोकांची प्रचंड गर्दी असते.