CRIME NEWS MUMBAI : कुर्ल्यात मेट्रोचं काम सुरू असलेल्या साईटवर एका पुलाखाली बेवारस सूटकेस आढळली आली होती. या सुटकेसमध्ये एका महिलेचा मृतदेह Death Body सापडल्याने कुर्ल्यात Kurla मोठी खळबळ उडाली आहे. सूटकेस सापडल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. सूटकेस उघडताच त्यामध्ये महिलेचा मृतदेह आढळल्याने पोलिसही हादरले.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी, १९ नोव्हेंबर रोजी कुर्ला पोलीस ठाण्यात एका फोन आला. सी.एस टी.रोड शांतीनगरच्या समोरील बाजूला मेट्रो रेल्वेच्या कामाच्या जागेवरील बॅरेकेटचे आतील बाजूस एक संशयित, बेवारस सुटकेस आहे. हि माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तपासणी केली असता त्या सुटकेसमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आला. दरम्यान ही महिला कोण, तिचा खून कुणी केला, ती सूटकेस कोणी टाकली, या सर्व प्रश्नांची उत्तरं अजून मिळालेली नाहीत. पोस्टमॉर्टमसाठी पोलिसांनी तो मृतदेह राजावाडी रुग्णालयात पाठवला असून पुढील तपास सुरू आहे.
हे वाचलेत का ? सकल मराठा समाज सभा : पुणे-नगर रोडवरील जड वाहतुक पर्यायी मार्गाने वळविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
पोलिसांच्या सांगण्यानुसार, ती महिला अंदाजे 20 ते 25 वयोगटातील असल्याचे समजते. तिने टीशर्ट आणि ट्रॅक पॅन्ट घातलेली होती. तिचा मृतदेह सूटकेसमध्ये दुमडलेल्या अवस्थेत सापडला. मात्र तिची ओळख पटवणारी कोणतीही गोष्ट सुटकेसमध्ये आढळली नाही. कुर्ला पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.