World Cup 2023 : विराट कोहलीने रिकी पाँटिंगचा विक्रम मोडला. भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जात असलेल्या अंतिम सामन्यात क्रीजवर पाऊल ठेवताच मोठा टप्पा गाठला. एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा किंग कोहली दुसऱ्या स्थानावर आला आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया फायनल: विराट कोहलीने मोडला रिकी पाँटिंगचा विक्रम
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर शुभमन गिलच्या रूपाने टीम इंडियाला पहिला धक्का बसला. गिलला या सामन्यात केवळ ४ धावा करता आल्या. यानंतर रोहित शर्माच्या रूपाने दुसरा धक्का बसला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना विराट कोहलीने सामन्यात 3 धावा करत मोठा विक्रम केला.
किंग कोहली वनडे विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. यावेळी त्याने रिकी पाँटिंगचा विक्रम मोडला. एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत किंग कोहली आता दुसऱ्या स्थानावर आला आहे. कोहलीने 1767 धावा केल्या आहेत. सचिन तेंडुलकर 2278 धावांसह त्याच्यापुढे आहे.
हे वाचलेत का ? 2023 World Cup : भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली 54 धावांवर बाद; भारताला मोठा धक्का
एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
- सचिन तेंडुलकर (भारत)- 2278 धावा
- विराट कोहली (भारत)- 1767 रन
- रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया)- 1743 रन
- रोहित शर्मा (भारत)- 1575 रन
- कुमार संगकारा (श्रीलंका)- 1532 रन