TRENDING : गुगल हा एक असा प्लॅटफॉर्म आहे जिथे तुम्ही काहीही प्रश्न विचारू शकता आणि ज्यावर गुगल तुम्हाला जेवढी उपलब्ध आहे तेवढी माहिती पुरवत असतो. गुगलवर लोक काय प्रश्न विचारतील याचा खरंतर भरोसा नाहीये. पण या दिवाळीमध्ये गुगलवर व्हाय ‘WHY’ हा शब्द ट्रेंड होतोय. अर्थात मराठी मध्ये का ? यावरूनच अनेक प्रश्न विचारले गेले आहेत. गुगलचे सीईओ सुंदर पीचाई यांनी याविषयी माहिती दिली आहे.
भारतीयांनी विचारले हे प्रश्न !
गुगलचे सीईओ सुंदर पिचई यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवाळीमध्ये भारतीयांनी अनेक प्रश्न विचारले आहेत. यामध्ये भारतीय दिवाळी का साजरी करतात ? दिवाळीत रांगोळी का काढली जाते ? दिवाळीमध्ये लाईट किंवा आकाश दिवे का लावले जातात ? दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन का केले जाते ? अभ्यंग स्नान का केले जाते ? असे प्रश्न भारतीयांनी विचारले आहेत. याविषयी सोशल मीडियावर एक पोस्ट करून त्यांनी ही माहिती दिली. आणि भारतीयांना दिवाळीच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत.