ONLINE SIP : डिजिटायजेशनच्या युगात जर आपल्याला एसआयपी (सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) सुरू करायचा असेल तर आपण कोणत्याही अडचणींशिवाय ऑनलाइनच्या माध्यमातून एसआयपी सुरू करू शकता. एसआयपी हा एक म्युच्युअल फंडमधील गुंतवणूकीचा पर्याय मानला जातो. एसआयपी सुरू करण्यापूर्वी आपल्याला केवायसी कागदपत्रे असणे गरजेचे आहे. त्यात आयडी पुरावा, पत्त्याचा पुरावा, आयव्हीपी, पॅनकार्ड आयव्हीपीतंर्गत आपल्या फिजिकली प्रजेन्ससाठी फंड हाऊस किंवा पर्सनल व्हेरिफिकेशन पाहू शकता. याशिवाय एक पासपोर्ट साईज फोटो आणि चेकबुक असणे गरजेचे आहे, जेणेकरून त्यात बँक खात्याची माहिती असते आणि एसआयपीची रक्कम महिना किंवा तिमाहीनुसार कपात होईल.
ई-केवायसीची प्रक्रिया जाणून घ्या : केवायसी प्रक्रिया समजून घेण्यासाठी आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी आपण कोणत्याही संकेतस्थळावर ई-केवायसीची सुविधा पाहू शकता. कोणत्याही एका संस्थेबरोबर केवायसीची केलेली पूर्तता ही सर्वच फंड हाऊसला मान्य होते. ई-केवायसीसाठी आपण ट्रान्सफर एजंट किंवा रजिस्ट्रारच्या संकेतस्थळावर जावू शकता. केवायसीसाठी राहण्याचा पुरावा, ओळखीचा पुरावा, पॅनकार्ड, आधार क्रमांक यासारख्या गोेष्टींची गरज आहे. सामान्य माहितीबरोबरच एकाचवेळी फॉर्म भरणे शय आहे. शेवटच्या टप्प्यात एसआयपी सुरू करण्यासाठी फंड हाऊसच्या संकेतस्थळावर जावे.
केवायसीनंतरची प्रक्रिया : एसआयपी गुंतवणूकदारांनी निवडलेल्या फंड हाऊसच्या संकेतस्थळावर जाणे गरजेचे आहे. याठिकाणी आपण एक गुंतवणुकदार म्हणून माहिती भरू शकतो. फंड हाऊस आपल्याला ऑनलाइन ट्रांझेशनसाठी लॉग इन होण्यासाठी सूचना देतो. बँकेत ऑटो डेबिटची प्रक्रिया पूर्ण करावी आणि त्यानंतर बँकेकडून ऑटोडेबिटसंदर्भात असलेली माहिती आपल्याला दिली जाते. त्यानंतर कंपनी आपल्याला एसआयपीमध्ये डेबिटची तारीख विचारेल आणि नंतरच एसआयपीमधील गुंतवणूक सुरू होईल.