मुंबई : दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला नरक चतुर्दशी साजरी केली जाते. पंचांगानुसार, सूर्योदयापूर्वी चतुर्दशी तिथी असते आणि सूर्यास्तानंतर अमावस्या तिथी असते तेव्हा नरक चतुर्दशी आणि लक्ष्मी पूजा एकाच दिवशी केली जाते. यावर्षी नरक चतुर्दशी आणि लक्ष्मी पूजन एकाच दिवशी आले आहे. म्हणजेच उद्या 12 नोव्हेंबरला, रविवारी साजरी केली जाणार आहे. या दिवशी अभ्यंग स्नान केले जाते.
नरक चतुर्दशीला अभ्यंग स्नान करण्याचं महत्त्व अत्यंत महत्त्वाचं मानले जाते. हिंदू मान्यतेनुसार, जे लोक नरक चतुर्दशीला अभ्यंग स्नान करतात ते स्वतःला नरकात जाण्यापासून रोखू शकतात. आणि सर्व पापातून मुक्त होतात. नरक चतुर्दशी त्याच दिवशी किंवा कधीकधी लक्ष्मीपूजनाच्या एक दिवस आधी साजरी केले जाते. अभ्यंग स्नान सूर्योदयापूर्वी करावे, नरक चतुर्दशीच्या दिवशी दिव्यांच्या प्रकाशाने अंधार दूर होतो. या दिवशी अभ्यंग स्नान करताना दिवे लावावे. नरक चतुर्दशी 2023 महत्त्व या दिवशी कृष्ण, सत्यभामा आणि काली यांनी नरकासुर राक्षसाचा वध केला.
या दिवशी लवकर उठतात आणि आंघोळीपूर्वी अंगावर सुगंधी तेल लावतात आणि सुगन्धी उटण्याने अंघोळ करतात. नवीन वस्त्रे परिधान करतात. आणि देवळात जाऊन कृष्णाचे किंवा विष्णूंचे दर्शन करतात. संध्याकाळी फटाक्यांची आतषबाजी करून उत्सवाचा आनंद लुटला जातो. या दिवशी पुरुषांच्या अभ्यंग स्नानाचे विशेष महत्त्व आहे. सूर्योदयापूर्वी तिळाचे तेल लावतात. असं केल्याने त्यांचे गरिबी आणि दुर्दैवापासून संरक्षण होते या विश्वासाने हे सण साजरे केले जाते.