मुंबई : खासदार सुनील तटकरे यांचे तात्काळ निलंबन करा, अशा मागणीचे पत्र खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिले आहे. परिशिष्ट दहा नुसार पक्षविरोधी कृती केल्याने सुनील तटकरे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी पत्राच्या माध्यमातून सुप्रिया सुळेंनी लोकसभा अध्यक्षांना विनंती केली आहे. तसेच चार महिने उलटून देखील कोणतीही कारवाई न झाल्याने सुप्रिया सुळे यांनी पत्राच्या माध्यमातून खंत व्यक्त केली. कारवाई होत नसल्याने परिशिष्ट दहाचे उल्लंघन होत असल्याची बाब सुप्रिया सुळेंकडून नमूद करण्यात आली आहे.
https://x.com/supriya_sule/status/1720314308360610246?s=20
खासदार सुनील तटकरे यांना अपात्र करण्यासाठी आम्ही 4 जुलैला याचिका दाखल केली होती. मात्र, आजपर्यंत त्यावर कुठलीही करावी केली गेली नाही. त्यामुळे लवकरात लवकर निर्णय घ्या, अशी विनंती खासदार सुप्रिया सुळे यांनी ओम बिर्ला यांच्याकडे केली आहे.
स्वतःच्या राजकीय महत्त्वाकांक्षा साध्य करण्यासाठी या नेत्यांनी पक्षविरोधी कारवाई केली आहे. तसेच राष्ट्रवादीला देण्यात आलेल्या मतांना त्यांनी न जुमानता मतदारांचाही विश्वासघात केला आहे. त्यामुळे राज्यघटनेच्या 10 व्या परिशिष्टानुसार, पक्षांतरबंदी कायद्यांच्या अंतर्गत या नेत्यांवर तात्काळ अपात्रतेची कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली होती.