मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये वानखेडे मैदानावर सामना सुरु आहे. श्रीलंकेविरोधात विराट कोहलीने 34 धावा करत मोठा विक्रम करून सचिनचा देखील विक्रम मोडला आहे. एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक वेळा एक हजार धावांचा विक्रम आता विराट कोहलीच्या नावावर जमा झालाय.
https://x.com/CricCrazyJohns/status/1720009980819144940?s=20
विराट कोहलीने आठव्यांदा एका वर्षांत एक हजार धावांचा पल्ला पार केला आहे. याआधी विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर यांनी प्रत्येकी सात वेळा वनडे क्रिकेटमध्ये एका वर्षात एक हजारांपेक्षा जास्त धावा केल्या होता. आज विराट कोहलीने सचिन तेंडुलकरला मागे टाकल आहे.भारत आणि श्रीलंका सामन्यामध्ये भारताची सुरुवात अतिशय खराब झाली. कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्याच चेंडूवर तंबूत परतला. पण त्यानंतर विराट कोहली आणि शुभमन गिलच्या साथीने डावाला पुन्हा उभा राहिला. विराट कोहली आणि शुभमन गिल यांनी शतकी भागिदारी केली. विराट कोहलीने आपले अर्धशतकही पूर्ण केले. विराट कोहलीने 53 चेंडूत 52 धावांवर खेलत आहे. भारताने एक विकेट्सच्या मोबदल्यात 120 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
हे वाचलेत का ? एक भाऊ मराठा-दुसरा कुणबी ? सख्ख्या भावांच्या दाखल्यावर वेगवेगळ्या नोंदी ! राज्यात असे प्रकार समोर येण्याची शक्यता