अलीकडे वैद्यकीय उपचारांचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. हा खर्च करणे सामान्य माणसाच्या आवायाबाहेर गेले आहे. हृदयविकार, पॅरालिसिस, मूत्रपिंडातील बिघाड, कॅन्सर, स्ट्रोक यासारख्या आजारांवर उपचार करण्याकरिता प्रचंड खर्च येत असतो. अशा आजारांवर खर्च करण्याची प्रत्येकाची ऐपत नसते. ज्यांची ऐपत नसते त्यांना आपल्याकडील सर्व बचत उपचाराकरिता खर्च करावी लागते. अशाकरिता आरोग्य विमा म्हणजेच, हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी उपयुत ठरते. काही वेळा मेडिलेम पॉलिसी म्हणजेच हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीद्वारेही या उपचारांचा खर्च भरून निघू शकत नाही. त्यामुळे क्रिटिकल इलनेस इन्शुरन्स पॉलिसी ही अत्यंत उपयुत ठरणारी आहे. ही पॉलिसी जनरल इन्शुरन्स कंपन्यांकडून दिली जाते. मेडिलेम आणि क्रिटिकल इलनेस पॉलिसी यामध्ये अंतर आहे.
मेडिलेम पॉलिसीमध्ये आपल्याला रूग्णालयात जेवढा खर्च होतो तेवढा भरून मिळतो. म्हणजे एखाद्या रुग्णाने दोन लाख रुपयांची पॉलिसी काढली असेल तर त्याला तेवढे पैसे त्या विमा कंपनीकडून मिळतात. क्रिटिकल इलनेस इन्शुरन्स पॉलिसी ही वेगळी आहे. जर त्या रुग्णाने विमा कंपनीच्या सर्व अटी पूर्ण केल्या तर त्याला विम्याचे सर्व पैसे दिले जातात. तुम्हाला हॉस्पिटलमध्ये किती खर्च आला. तसेच अन्य उपचारांकरिता किती खर्च आले याच्याशी विमा कंपनीला काहीच देणे-घेणे नसते. यातून मिळालेल्या पैशाचा वापर रुग्ण कोणत्याही पद्धतीने करू शकतो.
सोप्या शब्दात सांगायचे झाले तर, तुम्हाला जर एखादा गंभीर आजार असेल आणि तुम्ही क्रिटिकल इलनेस पॉलिसी काढली असेल तर विमा कंपनी तुम्हाला तुमच्या विम्याची (सम अॅश्युअर्ड) पूर्ण रकम देऊन टाकेल. या पैशाचा वापर कसा करायचा हे त्या रुग्णाने ठरवायचे असते. मेडिलेम पॉलिसीमध्ये अनेक आजारांवर उपचार होत असतात. क्रिटिकल इलनेस पॉलिसींमध्ये काही गंभीर आजारांना संरक्षण दिले जाते. कर्करोग, हृदयविकारावरील बायपास शस्त्रक्रिया, हृदयविकाराचा पहिला झटका, मूत्रपिंड निकामी होणे, मस्तीष्काघात (स्ट्रोक), पॅरालिसिस, ब्रेन ट्युमर, अंधत्व, पार्किनसन्स, अल्झायमर यासारख्या आजारांचा क्रिटिकल इलनेस इन्शुरन्स पॉलिसीमध्ये अंतर्भाव असतो. वेगवेगळ्या विमा कंपन्या काही दुसर्या आजारांनाही संरक्षण देत असतात.
या पॉलिसीचा लेम मिळवण्यासाठी रुग्णालयात दाखल होण्याची आवश्यकता नसते. बहुतांश विमा कंपन्या तुम्हाला संबंधित व्याधी आहे असे कळल्यावर त्यावरील उपचारांचे पैसे देऊन टाकतात. मेडिलेम पॉलिसीमध्ये विमा कंपन्या आपल्या नेटवर्कमध्ये असलेल्या रुग्णालयात कॅशलेस हॉस्पिटलायझेशनची सुविधा देत असतात. कंपनी नेटवर्कमध्ये नसलेल्या रूग्णालयात उपचार केल्यास रुग्णाला त्या उपचाराचे बिल सादर करावे लागते. बिल सादर केल्यानंतर त्याला तो खर्च भरून दिला जातो. मेडिलेम पॉलिसीमध्ये तीन महिन्यांचा प्रतिक्षा कालावधी असतो.
क्रिटिकल इलनेस पॉलिसीमध्ये हा कालावधी ३० दिवसांचा असतो. क्रिटिकल इलनेस पॉलिसी घेताना तुमचे वय जितके अधिक असेल तितका फायदा अधिक होतो. ही पॉलिसी खरेदी करताना त्याचे नुतनीकरण करण्यासाठी वयाची अट आहे का? हे पाहून घ्या. नुतनिकरणाची वयाची अट अधिक असेल तर तुम्हाला त्याचा फायदाच होईल. काही कंपन्यांची नुतनीकरणाची अट ६० वर्षांपर्यंतच असते. अशी पॉलिसी अनेकांना उपयोगी ठरणार नाही. याचे कारण अनेकांना वयाच्या ६० नंतर गंभीर आजार झाल्याची उदाहरणे आहेत.
क्रिटिकल इलनेस पॉलिसीत तुम्ही तुमच्या वार्षिक उत्पन्नाच्या दीड ते दोन पट रकमेचा विमा उतरवू शकता. म्हणजे तुमचे वार्षिक उत्पन्न चार लाख असेल तर तुम्ही कमीतकमी साह ते आठ लाख रुपयांपर्यंतची पॉलिसी घेऊ शकता. या पॉलिसीमध्ये सर्व्हायवल पिरेड देण्यात आलेला असतो. आजार झाल्यानंतर किती दिवस जिवंत राहिल्यावर लेम दिला जाणार हे, सर्व्हावय पिरेडवर ठरविले जाते. हा कालावधी वेगवेगळ्या कंपन्यांनुसार वेगळा असतो. साधारण एक ते सहा महिने असा हा कालावधी असतो. या पॉलिसीचा फ्री लूक पिरेड जेवढा अधिक असेल, तेवढा ग्राहकांच्या दृष्टीने चांगला समजला जातो. जर तुम्हाला पॉलिसीच्या अटी पंसत नसतील तर या कालावधीत तुम्ही पॉलिसी परत करू शकता. या पॉलिसीत जितया अधिक आजारांना संरक्षण दिले जाते तेवढा ग्राहकाचा फायदा होतो. प्रतिक्षा कालावधी (वेटिंग पिरेड) संपल्यानंतर पॉलिसीद्वारे मिळणारे संरक्षण चालू होते.
हा प्रतिक्षा कालावधी जेवढा कमी असेल तेवढा चांगला समजला जातो. काही कंपन्यांचा प्रतिक्षा कालावधी चार वर्षांचा असल्याचे सांगितले जाते. ज्या कंपनीचा लेम सेटलमेंटचे रेकॉर्ड चांगले असेल त्या कंपनीकडूनच अशी पॉलिसी घ्या. या पॉलिसी अंतर्गत सर्व गंभीर आजारांना संरक्षण मिळत नाही. काही आजार या पॉलिसीमध्ये कव्हर होत नाहीत. याचा अर्थ हे आजार झाल्यानंतर त्याचे पैसे आपल्याला मिळत नाहीत. आत्महत्या करणे, तसेच धोकादायक खेळांमध्ये सहभागी होणे, अतिरित प्रमाणात दारू पिणे अशा कारणांमुळे जर रुग्णाचा मृत्यू झाल्यास किंवा आजार झाल्यास त्याला संरक्षण मिळू शकत नाही. जन्मजातचे वंंशपरंपरेने येणार्या आजारांवरही या पॉलिसीचे संरक्षण मिळत नाही. एचआयव्ही, अॅड्स या व्याधीलाही या पॉलिसीच्या संरक्षणाबाहेर ठेवण्यात आले आहे. सध्याच्या जिवनशैलीमुळे अनेक गंभीर आजार होण्याची शयता वाढली आहे. काही आजार तर पूर्वी फत वृद्धावस्थेत होत असते, ते अलीकडे तरुण मुलांनाही होऊ लागले आहेत. त्यामुळ तरुणांनाही अशा आजारांपासून विमा संरक्षण मिळवणे आवश्यक होऊन बसले आहे.