ऑक्टोबर महिना हा मनोरंजनसृष्टीत सर्वात महत्वाचा आठवडा ठरला आहे. या महिन्यात अनेक चित्रपट, वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. कित्येक दिवसांपुरवी प्रदर्शित झालेले चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाले आहेत. अशातच या आठवड्यात Netflix, Amazon Prime Video, Disney Plus Hotsatr या ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक दर्जेदार चित्रपट आणि वेबसीरिज प्रदर्शित होणार आहेत.
यामध्ये प्रेक्षकांना मनोरंजन, अॅक्शन, ड्रामा अशा सर्व प्रकारच्या जोष्टीनचा आनंद घेता येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना या ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घरबसल्या मनोरंजनाची मेजवानी पाहायला मिळणार आहे.
दुरंगा 2 : 2022 साली प्रदर्शित ‘दुरंगा’ ही वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. आता या वेबसिरीजचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 2022 साली ‘दुरंगा’ ही वेबसिरीज ओटीटी प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक पसंतीची मालिका ठरली आहे. दुरंगा 2 ही सिरीज सायको क्राईम थ्रिलर आहे. या सीरिजचे एकूण 8 भाग प्रदर्शित झाले आहेत.
दुरंगा 2 ही वेबसीरीज 24 ऑक्टोबर Zee5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली आहे. दृष्टी, अमित आणि गुलशन व्यतिरिक्त, अभिजीत खांडेकर, दिव्या सेठ, हीरा मिश्रा, राजेश खट्टर, झाकीर हुसेन, बरखा सेनगुप्ता, निवेदिता सराफ, संजय गुरबक्सानी, श्रीनिवास प्रसाद किरण आणि स्पर्श वालिया या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. गुलशन देवैया आणि दृष्टी धामी यांची वेब सीरिज ‘दुरंगा’ ही कोरियन मालिका ‘फ्लावर ऑफ एव्हिल’चा रिमेक आहे.
चंद्रमुखी 2 : चंद्रमुखी 2 हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर येण्यास सज्ज झाला आहे. 2005 मध्ये आलेल्या ‘चंद्रमुखी’ सिनेमाचा हा सीक्वेल आहे. या चित्रपटात कंगना राणौत, महिमा नांबियार, राघव लॉरेन्स आणि सुभिक्षा यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.. या चित्रपटाने रिलीजनंतर बॉक्स ऑफिसवर 49.65 कोटींची कमाई केली आहे. ‘चंद्रमुखी 2’ हा सिनेमा नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. चंद्रमुखी 2 या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा पी. वासू यांनी सांभाळली आहे. हा चित्रपट 26 ऑक्टोबर 2023 ला नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
पेन हसलर्स : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला ‘पेन हसलर्स’ हा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. या एक थरार नाट्य सिनेमा आहे. पेन हसलर्स या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा डेविड येट्स यांनी सांभाळली आहे. हा चित्रपट ह्यूजेस नामक पुस्तकावर आधारित आहे. अनेक दिवसांपासून प्रेक्षक या चित्रपटाची वाट पाहत होते. आता पेन हसलर्स हा चित्रपट 27 ऑक्टोबरला नेटफ्सिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना या आठवड्याच्या वीकेंडला या सिनेमाची मेजवानी पाहायला मिळणार आहे.