नांदेड : महाराष्ट्राच्या नांदेड जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी उघडकीस आली आहे. नांदेड जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातून गेल्या 24 तासात बारा नवजात बालकांसह अनेकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने महाराष्ट्रातून एकीकडे हळहळ व्यक्त होत असताना सामान्य आणि राजकीय नेत्यांमधून देखील संताप व्यक्त केला जातो आहे.
https://x.com/RahulGandhi/status/1708888967347945756?s=20
मिळालेल्या माहितीनुसार, हाफकीन औषध खरेदी बंद केल्यामुळे राज्यभरातील शासकीय रुग्णालयात औषधांचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. रुग्णालयातील अत्यावस्थ रुग्णांना वेळेत औषध पुरवठा न झाल्यामुळे अनेक रुग्णांना आपले जीव गमवावे लागले आहेत.
https://x.com/AshokChavanINC/status/1709052924507344973?s=20
दुःखद म्हणजे गेल्या 24 तासात तब्बल 24 रुग्णांचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. यामध्ये 12 नवजात बालकांचा समावेश आहे. डीन डॉक्टर शामराव वाकोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 तासांमध्ये सहा पुरुष आणि सहा मुलींचा मृत्यू झाला बारा किशोरवयीन रुग्णांनी देखील जीव गमावला आहे. तसेच अनेक कर्मचाऱ्यांच्या बदल्यामुळे देखील अडचणी निर्माण झाल्या असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. काही दिवसांपासून रुग्णांची वाढ झपाट्याने झाली होती. त्यामुळे बजेटचा देखील प्रश्न निर्माण झाला आहे. स्थानिक पातळीवर औषधे खरेदी करून रुग्णांना दिले आहेत. परंतु औषध खरेदी बंद केल्यामुळे शासकीय रुग्णालयात औषधांचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे.