पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला आहे. भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने सत्यशोधक समाज स्थापनेच्या शतक उत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सत्यशोधक संमेलनाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमांमध्ये बोलताना ते म्हणाले की, सध्या देशात असत्याचा मार्ग अवलंबून राजकीय सामाजिक अस्थिरता निर्माण करण्याचे प्रयत्न वारंवार केले जात आहेत. सत्य मांडणाऱ्या लोकांवर सूडबुद्धीने कारवाई केली जाते आहे. फॅसिस्ट शक्तींना रोखण्यासाठी सत्यशोधक आंदोलनाची प्रासंगिकता राष्ट्रीय पातळीवर आहे असं यावेळी ते म्हणाले.
या कार्यक्रमांमध्ये भाषणादरम्यान शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर कडवे टीकास्त्र सोडले आहे. बहुजन समाजाला धार्मिक सामाजिक शैक्षणिक गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली महात्मा फुले यांच्यानंतर सावित्रीबाई फुले मुक्ता साळवे राजश्री छत्रपती शाहू महाराज भास्करराव जाधव भाई माधवराव बागल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केशवराव जेधे दिनकरराव जवळकर इत्यादी विचारवंतांनी हे वैचारिक आंदोलन पुढे सुरू ठेवले तसेच आपण आता आधुनिक विचारांचा पुरस्कार केला पाहिजे असे देखील यावेळी शरद पवार म्हणाले आहेत.
या कार्यक्रमासाठी मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड प्रतिभा उबाळे सचिन बनसोडे संगीता शिंदे आधी उपस्थित होते.